शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
2
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
3
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुडवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
4
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
5
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
6
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
7
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
8
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
9
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
10
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
11
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
12
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
13
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
14
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर
15
शरणू हांडेचं अपहरण करणारा 'तो' युवक आणि मास्टरमाईंड कोण?; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप
16
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
17
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
18
Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स
19
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
20
Video - 'ते' आले अन् धारदार शस्त्रांनी केला हल्ला; हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येचे CCTV फुटेज

...आणि म्हणे हिन्दु धर्म परमसहिष्णु आहे!

By admin | Updated: September 11, 2015 01:03 IST

...आणि म्हणे हिन्दु धर्म परमसहिष्णु आहे!

हेमंत कुलकर्णी श्रावण मास अजून संपलेला नाही. या संपूर्ण महिन्यात म्हणे हिन्दु धर्मातील परम भावभोळे सामीष भोजनाला स्पर्श करीत नाहीत. महिनाभराचा उपवास होणार या भावनेनेच कापरे भरणाऱ्या त्यांच्या जिव्हांनी त्यांना दिव्याच्या अमावस्येलाच गटारीची आवस बनवून टाकण्यासाठी उद्युक्त केलेले.मुळात केवळ श्रावणातच नव्हे तर चतुर्मासात वातुळ म्हणजे पचायला जड पदार्थांचे सेवन बव्हंशी धर्मांनी (अगदी हिन्दु धर्मासकट) त्याज्य ठरविले कारण तेव्हां पावसाळा असतो आणि या काळात पोटातील अग्नी मंद होत असतो. म्हणजे सामीष पदार्थांच्या सेवनाचा संबंध थेट आरोग्य रक्षणाशी आहे. पूर्वी ते सांगून पटले नसते म्हणून त्याला धर्माची जोड, इतकेच. तरीही जे महिनाभर दम धरु शकतात, त्यांचा जीव चार-आठ दिवस दम धरायला इतका कासावीस व्हावा?तरीही श्रावण वगळता एरवी रोजच मासाहार करणारे, तो खिशाला आणि पोटालाही परवडू शकणारे असे कितीसे लोक आहेत? मटण फार महाग झाले हो, परवडत नाही, अशी तक्रार कोणाची असते? आठवड्यातले रविवार आणि बुधवार वगळता, अन्य दिवशी मासाहार वर्ज्य मानणारे बहुसंख्य आहेत. उरलेले पाच दिवस मग ते कशी तग धरु शकतात? संपूर्ण श्रावण महिना आणि आठवड्यातले पाच दिवस नित्याचे मासाहारी मासभक्षण करीत नाहीत तेव्हां केवळ त्याच व्यवसायावर ज्यांचे पोट आहे, त्यांच्या पोटाची काळजी कोण वाहत असते? तरीही रोज मासमच्छी खाल्ल्याशिवाय ज्यांचे पानच हलू शकत नाही असेच बहुसंख्य लोक महाराष्ट्रात आहेत, असे गृहीत धरले आणि त्यांनी त्यांच्या होणाऱ्या संभाव्य उपासमारासाठी आकाश पातळ एक करण्याचा उपक्रम सुरु केला तर लोकशाहीने त्यांना तो अधिकार दिलाच आहे. पण लोकशाहीने कोणालाही परधर्माविषयी आणि परधर्माच्या आस्थांविषयी अत्यंत हिणकस उद्गार काढण्याचा अधिकार दिलेला नाही. का मग येथेही बहुसंख्य आणि अल्पसंख्य असा भेद केला जातो आणि जे अल्पसंख्य आहेत पण आक्रमक नाहीत कारण त्यांच्या धर्मातच अहिंसा आहे त्यांची अवहेलना करण्याची मोकळीक आहे, असे मानले जाते. महाराष्ट्रातील तमाम मांसभक्षकांचे केवळ आपणच तारणहार आहोत असे मानणाऱ्यांच्या दुभंगातून एरवी किरकोळ वाटणारा वाद गलिच्छपणाच्या मर्यादा पार करुन गेला आहे. जैन धर्मातील दिगंबरांची अवहेलना करतानाच त्र्यंबकेश्वरी जमणाऱ्या नागा साधूंच्या दर्शनाची अभिलाषा बाळगणाऱ्यांनी जरा त्या नागा साधूंविषयीदेखील असेच हिणकस उद्गार काढून पाहावेत. ‘रक्त की नदीयाँ बहेंगी’! दुर्बळांवर वा अहिंसेचा स्वीकार करणाऱ्यांवर वार करण्यात कोणते आले आहे मोठे शौर्य? ‘आमच्या खाण्या-पिण्यावर बंदी आणणारे कोण? आम्हाला घटनेनेच आहार स्वातंत्र्य दिले आहे’ अशी वकिली करणारे उद्या नरमांसभक्षकही होणार आहेत? होतीलही कदाचित. पण तेव्हां येईल ती राज्यघटना त्यांच्या मदतीला?