शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

...अन् पोलिसांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

By admin | Updated: July 17, 2017 00:17 IST

पंचवटी : वेळ दुपारी तीन वाजेची...स्थळ तपोवनातील केवडीबन समोरील गोदावरी नदीपात्र. सगळ्यांच्या नजरा गोदावरी नदीपात्रात वाहून आलेल्या त्या बॉक्सवर .

लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : वेळ दुपारी तीन वाजेची...स्थळ तपोवनातील केवडीबन समोरील गोदावरी नदीपात्र. सगळ्यांच्या नजरा गोदावरी नदीपात्रात वाहून आलेल्या त्या बॉक्सवर ..प्लॅस्टिक दोरीने बांधलेल्या त्या बॉक्समध्ये नेमके काय आहे हे जाणून घेण्यासाठी सगळेजण उत्सुक होते. घटनास्थळी पोलीसही पोहचले होते. दोरीने आवळलेल्या त्या बॉक्समध्ये नक्कीच काहीतरी संशयास्पद आढळून येणार असे वाटत असतानाच पोलिसांनी एका नागरिकाच्या मदतीने तो बॉक्स उघडला अन् पोलिसांसह उपस्थित असलेल्या सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. बॉक्सकडे उत्सुकतेने बघत जमलेल्या नागरिकांनी बॉक्स उघडताच त्यातील गादी कुशन्स बघून काढता पाय घेतला. शनिवारी (दि.१५) दुपारी तपोवनातील केवडीबन येथे असलेल्या गोदावरी नदीपात्रात एक प्लॅस्टिक गुंडाळलेला बॉक्स पाण्यात वाहून आला व तो बॉक्स दोरीने घट्ट बांधलेल्या अवस्थेत असल्याने त्यात काहीतरी संशयास्पद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. काही वेळातच पंचवटी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पाण्याने वाहून आलेला बॉक्स किनाऱ्यावर आल्याने त्यात काहीतरी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली तो पावेतो घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. पोलिसांनी अखेर एका इसमाला कथड्यावरून खाली उतरविले व वाहून आलेल्या बॉक्सचा दोर त्या इसमाने कापून त्यावरील प्लॅस्टिक हटविले असता त्यात गादीसाठी लागणारे तीन ते चार कुशन्सचे तुकडे आढळून आले. पोलिसांनी चौकशी करत त्या बॉक्समध्ये काही संशयास्पद वस्तू मिळून न आल्याची माहिती वरिष्ठांना कळवून माघारी फिरले.