..अन् डॉक्टर ठरले सर्पदंश झालेल्या महिलेसाठी देवदूत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 10:59 PM2020-03-08T22:59:17+5:302020-03-08T23:05:32+5:30

नांदगाव : वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरला मिळणाऱ्या मानाचा हेवा सामान्यांना वाटत असतो, मात्र प्रत्यक्षात जीवन मरणाच्या रेषेवर पोहोचलेला रुग्ण समोर आल्यानंतर त्याला वाचविण्यासाठी डॉक्टरला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते याचे उदाहरण येथील ग्रामीण रु ग्णालयात अनुभवयास आले.

..And the doctor becomes an angel for a serpent woman! | ..अन् डॉक्टर ठरले सर्पदंश झालेल्या महिलेसाठी देवदूत!

नाग दंश झालेल्या अनिता यांच्या समवेत बाळ, अनिताची आई, डॉ. रोहन बोरसे.

Next
ठळक मुद्देसुखरूप प्रसूती : बाळासह मातेची प्रकृती स्थिर; कुटुंबीयांनी सोडला नि:श्वास

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव : वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरला मिळणाऱ्या मानाचा हेवा सामान्यांना वाटत असतो, मात्र प्रत्यक्षात जीवन मरणाच्या रेषेवर पोहोचलेला रुग्ण समोर आल्यानंतर त्याला वाचविण्यासाठी डॉक्टरला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते याचे उदाहरण येथील ग्रामीण रु ग्णालयात अनुभवयास आले.
बाळंतपणाच्या एक दिवस आधी कोब्रा जातीचा नाग दंश झालेली अत्यवस्थ महिला रात्री रुग्णालयात आणली जाते. बाळाला वाचवायचे की आईला असा प्रश्न पडलेला असताना रात्रभर उपचार करून महिलेची प्रसूती केली जाते व बाळ आणि बाळंतीण सुखरूप असल्याचे पाहून कुटुंबीयांसाठी डॉक्टर देवदूत.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय विष तज्ज्ञ डॉ. हिंमतराव बाउसकर यांचाही सल्ला घेतात, उपचार सुरूच असतात, मात्र बाळाचे काय करायचे असा प्रश्न उभा ठाकतो; परंतु काही वेळातच अनिताची सामान्य प्रसूती
होते.
आईच्या शरीरावर विष, प्रतिविष, प्रतिजैविकांचा मारा यातून जन्माला आलेले बाळ कसे असेल? त्यालाही विषाचा धोका असेल का, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. मात्र, प्रथमदर्शनी बाळावर कसलाही परिणाम दिसून आला नसल्याचे कळताच सर्वजण सुटकेचा नि:श्वास सोडतात. बाळ व बाळंतिणीला सुखरूप घरी पाठविण्यात आले.शर्थीने उपचार नांदगाव तालुक्यातील साकोरे येथे माहेरपणासाठी आलेली गर्भवती अनिता दत्तू बोरसे (२२) सायंकाळी लघुशंकेसाठी घराबाहेर जाते. मात्र, तिचा पाय नागावर पडतो. यामुळे चवताळलेल्या नागाने दंश केला. ही बाब कळताच कुटुंबीय तिच्या पायाला आवळपट्टी बांधून ग्रामीण रु ग्णालयात दाखल करतात. डॉ. रोहन बोरसे व त्यांचे सहकारी शर्थीने उपचार सुरू करतात.

Web Title: ..And the doctor becomes an angel for a serpent woman!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.