शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या नाशिकमध्ये पौराणिक देखाव्यांवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 00:38 IST

गणेशोत्सवातील देखाव्यांची तयारी जुन्या नाशिकमध्ये काही अंशी पूर्ण झाली असून, जुने नाशिकमधील बहुतांश देखावे हे पौराणिक कथांवर आधारित आहेत. अगदी श्रीकृष्ण जन्मापासून ते अष्टविनायक दर्शनापर्यंत सर्व प्रकारचे धार्मिक पर्यटन पाहावयास मिळते.

नाशिक : गणेशोत्सवातील देखाव्यांची तयारी जुन्या नाशिकमध्ये काही अंशी पूर्ण झाली असून, जुने नाशिकमधील बहुतांश देखावे हे पौराणिक कथांवर आधारित आहेत. अगदी श्रीकृष्ण जन्मापासून ते अष्टविनायक दर्शनापर्यंत सर्व प्रकारचे धार्मिक पर्यटन पाहावयास मिळते. ंबी. डी. भालेकर मैदानावर महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा कंपनीच्या देखाव्यात बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन भाविकांना व्हावे, असा देखावा साकारण्यात आला आहे, तर शेजारीच असलेल्या एचएएल कामगार मित्रमंडळांच्या देखाव्यात ‘बेटी बचाओ’चा संदेश देणारा देखावा आहे. एमएसएल ड्राइव्हलाइन कंपनीने श्रीकृष्ण जन्माचा देखावा साकारला आहे. वासुदेव श्रीकृष्णाला नदीतून डोक्यावर घेऊन जाताना तसेच तुरुंगात होणारा श्रीकृष्णाचा जन्म असा देखावा आहे. येथेच नाशिक जिल्हा श्री नरहरीचा राजा सामाजिक संस्थेच्या गणेश आरासात विठ्ठल व महादेव यांचे श्री नरहरी यांना झालेला साक्षात्काराचा देखावा साकारण्यात आला आहे. श्री राजे छत्रपती सामाजिक, सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाचा देशातील एकमेव १००१ किलो वजनाची तांब्याची श्री लक्ष्मी गणेशमूर्ती साकारली आहे. दंडे हनुमान चौकात श्री दंडे हनुमान मित्रमंडळाच्या देखाव्यात महंत गणेशमूर्ती साकारली आहे.आझाद चौकात आझाद मित्रमंडळाने पोटा गणेशमूर्ती उभारली आहे. १९४६ला स्थापना झालेल्या राष्टÑीय तरुण मित्रमंडळाने शेषनागावर विराजमान विष्णू-लक्ष्मी मूर्तीची आरास उभारली आहे.साक्षी गणेश मित्रमंडळाने आकर्षक सभामंडपाचा देखावा साकारला आहे. भारत मित्रमंडळाने अष्टविनाायक दर्शनाची भाविकांना मेजवानी दिली आहे. भद्रकाली युवक मंडळाने सीता हरणाचे चलतचित्र साकरले आहे. भद्रकाली आॅटोरिक्षा युनियने विठ्ठलाचे आकर्षक रूप उभारले आहे. नटराज मित्रमंडळाचा भद्रकालीचा राजा यंदाही आकर्षण ठरेल. पिंपळचौक येथे श्रीसेवा कला व क्रीडा मंडळाची १३ फूट हनुमानाची मूर्ती आकर्षक आहे.९३ वर्षांची परंपराजनसेवा मित्रमंडळाने आकर्षक गणेशमूर्तीची स्थापना केली आहे. १९२५ची स्थापना असलेल्या ९३ वर्षांच्या सोमवार पेठेतील गुलालवाडी व्यायामशाळा मित्रमंडळाने उज्जैन येथील कालभैरव मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. ४३वे वर्ष असलेल्या वेलकम मित्रमंडळाने मदनलाल धिंग्रा यांनी इंग्लडमध्ये कर्नल व्हॅलीचा केलेल्या वधाचे चलतचित्र देखावा उभारला आहे. हिंदमाता मित्रमंडळाने महाकाली देवीचे रौद्रावतारासमोर शंकर पायाशी असलेला देखावा उभा केला आहे.