शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

‘कपालेश्वर’च्या कळसाजवळ आढळला प्राचीन शिलालेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 00:37 IST

शहरातील पंचवटी परिसरात रामकुंडाजवळ असलेल्या जगभरातील एकमेव नंदी नसलेल्या कपालेश्वर महादेव मंदिराच्या कळसाजवळ प्राचीन शिलालेख आढळून आला आहे.

नाशिक : शहरातील पंचवटी परिसरात रामकुंडाजवळ असलेल्या जगभरातील एकमेव नंदी नसलेल्या कपालेश्वर महादेव मंदिराच्या कळसाजवळ प्राचीन शिलालेख आढळून आला आहे. गोदाप्रेमी देवांग जानी यांनी कपालेश्वर मंदिराच्या इतिहासाचा अभ्यास करून मंदिराच्या छतावरील कळसाजवळ शोध घेण्याचा प्रयत्न केला असता शिलालेख आढळून आला. या शिलालेखावरील अक्षरे पुसट झाली आहेत.  कपालेश्वर महादेव मंदिराला धार्मिक-पौराणिक माहात्म्य लाभलेले आहे. रामशेज किल्ल्यावरून उगम पावणारी अरुणा ही उपनदी गोदावरीला येऊन मिळते. म्हणून या ठिकाणी कपालेश्वर मंदिराची उभारणी झाली. भगवान शंकर यांनी गोदा-अरुणा संगमावर स्नान केल्यानंतर विश्रांतीसाठी जवळच्या उंच टेकडीची निवड केल्याचे सांगितले जाते. अशा या ऐतिहासिक कपालेश्वर मंदिराच्या शिलालेखाबाबत गॅझेटियरमध्येही कुठलीही नोंद किंवा माहिती जानी यांना आढळली नाही. त्यानंतर त्यांनी ‘कि टू नाशिक-त्र्यंबक’ पुस्तक अभ्यासण्यास सुरुवात केली. या पुस्तकात त्यांना शिलालेख असल्याची माहिती मिळाली आणि त्यांनी त्यानुसार मंदिराच्या छताजवळ शोध घेण्यास प्रारंभ केला. वॉटरप्रूफिंगमध्ये प्राचीन शिलालेख झाकला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी ते सुरक्षितपणे उकरून शिलालेख मोकळा केला.असा आहे मंदिराचा इतिहास‘की टू नाशिक-त्र्यंबक’ या पुस्तकानुसार इ.स. ११०० साली स्थानिकांच्या विनंतीवरून गवळी राजाने जमिनी विकत घेत पाच हजार रुपये खर्च करून श्री कपालेश्वर मंदिर उभारले व संस्थानाकडे सोपविले. १७३८ मध्ये कोळी राजा नाशिकला मुक्कामी आला असता उर्वरित मंदिराचे बांधकाम त्याने पूर्ण केले. त्याचवेळी त्या राजाने शैव-गुरवांची नियुक्ती मंदिरात पूजाविधीसाठी केली. इ.स. १७६३ साली मंदिरातील पायऱ्या कृष्णाजी पाटील-पवार यांनी बांधून दिल्या. मूळ सभामंडपाचे बांधकाम जगजीवनराव पवार यांनी केले. १९०२ साली शेठ खिमजी आसर व अन्य काही लोकांनी वीस हजाराचा खर्च करून मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि मंदिर विश्वस्तांकडे सुपूर्द केले.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण