शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दीडशे एकर कोबीवर नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:17 IST

सिन्नर तालुक्यातील नायगाव खोºयात खरीप हंगामातील कोबी पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन जवळपास दीडशे एकरावरील कोबीच्या क्षेत्रावर असलेल्या उभ्या पिकावर रोटाव्हेटर फिरवण्याची दुर्दैवी वेळ शेतकºयांवर आली.

नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव खोºयात खरीप हंगामातील कोबी पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन जवळपास दीडशे एकरावरील कोबीच्या क्षेत्रावर असलेल्या उभ्या पिकावर रोटाव्हेटर फिरवण्याची दुर्दैवी वेळ शेतकºयांवर आली. ‘दैव देते अन् कर्म नेते’ अशी नैसर्गिक आपत्ती बळीराजावर ओढवल्यामुळे नायगाव परिसरातील कोबी उत्पादक शेतकरी आर्थिक दुष्टचक्रात लोटला गेला आहे. संपूर्ण नायगाव खोºयात सुमारे १३ कोटी रुपयांच्यावर शेतकºयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाने होरपळून आर्थिक बोजाखाली सापडला जाणारा शेतकरी यावर्षी कोबी व टमाटे ही पिके अस्मानी (नैसर्गिक) संकटामुळे काढणीला आलेले असताना शेतातच खराब (सडले) झाल्यामुळे परिसरातील शेकडो शेतकºयांच्या सुमारे दीडशे एकर कोबी पिकाचे म्हणजे सुमारे दोन हजार २०० टन कोबीचे नुकसान झाले असल्याचे परिसरात बोलले जात आहे. आहे. परिसरातील नायगाव, जायगाव, वडझिरे, देशवंडी आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कोबी व टमाट्याचे पीक घेतले जाते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेतकºयांनी हे पीक घेतले होते. महागडे बी, खते, औषधे व मजुरीचा एकूण ६० ते ७० हजार रुपये एकरी खर्च करुन हे पीक घेतले होते; मात्र काढणीला काही दिवस शिल्लक असताना या पिकांवर करपा, दांड्या, काळ्या टिपक्यांसह विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन दहा-पंधरा दिवसांत हे पीक मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने बाजारात विक्री अयोग्य झाले. दरम्यान गेल्या महिनाभरापासून कोबीला अनेक वर्षाच्या कालावधीनंतर मालाची प्रतवारी पाहून ७ ते १३ रुपये प्रतिकिलो दराने व्यापारी शेतात खरेदी करत आहे. सध्याच्या सरासरी बाजारभावाप्रमाणे सुमारे बारा ते तेरा कोटींपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत हे पीक विक्रीसाठी आले असते तर या पिकाचे बºयापैकी पैसे बळीराजाच्या पदरात पडले असते. मात्र, अगदी हातातोंडाशी आलेला बळीराजाचा घास निसर्गाने अक्षरश: हिसकावून घेतल्याचे चित्र निर्माण झाल्यामुळे कष्टकरी शेतकरी राजा निसर्गाच्या या अवकृपेमुळे आर्थिक बोजाखाली पुन्हा एखादा दबला गेला आहे, असे म्हटले तरी वावगे ठारणार नाही.