नाशिक : आचार्य स्वामी आनंदगिरी महाराज यांच्या महिनाभरापासून सुरू असलेल्या योगशिबिरामध्ये अनेक योगार्थींनी हजेरी लावून लाभ घेतला. या शिबिराचा सोमवारी (दि. २२) समारोप करण्यात आला.शिवसह्याद्री सामाजिक संस्थेच्या वतीने गंगापूररोड येथील चोपडा लॉन्स येथे गेल्या २१ आॅगस्टपासून योगशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये आचार्य स्वामी आनंदगिरी महाराज यांनी विविध योगक्रियांसह मार्गदर्शन केले. समारोपप्रसंगी आनंदगिरी महाराज यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, नाशिक ही महाराष्ट्राची राजधानी व्हावी, कारण सर्व शहरांचे केंद्रबिंदू नाशिक आहे. धार्मिक भावना व पर्यटनाच्या दृष्टीने नाशिक राजधानी झाल्यास सर्वसामान्यांना येणारा भाषेचा अडसर दूर होण्यास मदत होईल असे ते यावेळी म्हणाले. यावेळी महापौर अशोक मुर्तडक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आनंदगिरी यांच्या योगशिबिराची सांगता
By admin | Updated: October 3, 2015 00:03 IST