शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आनंद भाटे यांच्या स्वराविष्काराने रसिक मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:07 IST

भाऊबीजची मंगलमय पहाट, उगवत्या सूर्याचा किरमीजी रंग आणि सोबत गुलाबी थंडीत ज्येष्ठ शास्त्रीय गायक आनंद भाटे यांनी सादर केलेल्या स्वराविष्काराने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते ‘भाऊबीज पहाट’ कार्यक्रमाचे. शनिवारी (दि. २१) गंगापूररोड येथील प्रमोद महाजन उद्यानात दीपावलीनिमित्त ज्येष्ठ शास्त्रीय गायक आनंद भाटे यांच्या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.

नाशिक : भाऊबीजची मंगलमय पहाट, उगवत्या सूर्याचा किरमीजी रंग आणि सोबत गुलाबी थंडीत ज्येष्ठ शास्त्रीय गायक आनंद भाटे यांनी सादर केलेल्या स्वराविष्काराने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते ‘भाऊबीज पहाट’ कार्यक्रमाचे. शनिवारी (दि. २१) गंगापूररोड येथील प्रमोद महाजन उद्यानात दीपावलीनिमित्त ज्येष्ठ शास्त्रीय गायक आनंद भाटे यांच्या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.  मैफलीच्या सुरुवातीला गायक आनंद भाटे यांनी ‘जोगिया मोरे घर आये’ ही तीन तालातील बंदीश सादर केली. यानंतर ‘वद जाऊ कु णाला शरण’ हे नाट्यगीत, ‘काया ही पंढरी आत्मा पांडुरंग’ हे भक्तिगीत यासह वैविध्यपूर्ण गाण्याचे सादरीकरण करत रसिकांची दाद मिळवली. ही संगीत मैफल उत्तरोत्तर रंगत असताना ‘जोहार माय बाप जोहार’ या कानडी अभंगाने कार्यक्रमात विशेष रंगत आणली.संगीत मैफलीच्या अखेरीस आनंद भाटे यांनी ‘बाजे रे मुरलीया बाजे’ही रचना सादर केली तर ‘चिन्मया सकल हृदया’ या नावाजलेल्या भैरवीने या संगीत मैफलीची सांगता झाली.  यावेळी आनंद भाटे यांना भरत कामत (तबला), राहुल गोळे (संवादिनी), दिगंबर सोनवणे (पखवाज), सागर मोरस्कर (तालवाद्ये) यांनी साथ संगत केली तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना मिलिंद कुलकर्णी यांनी आपल्या खुमासदार निवेदनाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे आणि भाजपा प्रवक्ते सुहास फरांदे यांच्या प्रमुख संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास रसिकांनी विशेष दाद दिली.  या संगीत मैफलीस महापौर रंजना भानसी, पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, महिला आणि बालकल्याण विभागाच्या सचिव विनिता सिंगल, दिल्लीतील ‘लोकमत’चे राजकीय संपादक सुरेश भटेवरा, ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल, आमदार बाळासाहेब सानप, मनपा सभागृह नेते दिनकर पाटील, भाजपा प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, अ‍ॅड. नंदकिशोर भुतडा, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, अ‍ॅड. नितीन ठाकरे आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.गप्पा-सुरांची ‘भाऊबीज पहाट’नाशिकच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाºया पाडवा पहाट मैफलीप्रमाणेच शहरात भाऊबीज पहाट कार्यक्रमाचे आयोजन होऊ लागले आहे. शनिवारी नाशिककरांना स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य असलेले गायक आनंदगंधर्व आनंद भाटे यांच्या सांगीतिक मेजवानीची पर्वणी मिळाली. विविध मान्यवरांचे किस्से गप्पांच्या ओघात मांडताना सजलेली ही मैफल उत्तरोत्तर अधिकच खुलत गेली. यावेळी गायक आनंद भाटे यांनी सादर केलेल्या वैविध्यपूर्ण गीतांना नाशिककर रसिकांनी विशेष दाद दिली.