शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या धास्तीवर ‘योगा’ची मात्रा प्रभावी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 22:47 IST

नाशिक : दशकाच्या प्रारंभापासून योगाचा वाढू लागलेला प्रसार आणि आंतरराष्टÑीय योग दिन साजरा होऊ लागल्यापासून त्याच्या प्रसारात मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास मदतच झाली होती. मात्र, तरीदेखील जे नागरिक वेळेअभावी योगाकडे दुर्लक्ष करीत होते आणि प्राणायाम करणे टाळत होते, अशा नागरिकांनादेखील कोरोनाच्या धास्तीने योगा, प्राणायामकडे वळण्यास भाग पाडल्याचे चित्र गत तीन महिन्यांत दिसून आले.

ठळक मुद्देवाईटातून चांगले । नियमित योगासने करणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दशकाच्या प्रारंभापासून योगाचा वाढू लागलेला प्रसार आणि आंतरराष्टÑीय योग दिन साजरा होऊ लागल्यापासून त्याच्या प्रसारात मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास मदतच झाली होती. मात्र, तरीदेखील जे नागरिक वेळेअभावी योगाकडे दुर्लक्ष करीत होते आणि प्राणायाम करणे टाळत होते, अशा नागरिकांनादेखील कोरोनाच्या धास्तीने योगा, प्राणायामकडे वळण्यास भाग पाडल्याचे चित्र गत तीन महिन्यांत दिसून आले.सध्याच्या काळात प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या तणावाखाली असतो. त्यात कोरोनाचा प्रसार वाढू लागल्यापासून आपली प्रतिकारशक्ती चांगली रहावी, किमान आपल्याला तरी कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून एप्रिलपर्यंत ज्यांनी कधीही फारशी योगासने केलेली नव्हती, अशा व्यक्तीदेखील सहकुटुंब योगासने करू लागली आहेत. कोरोनाच्या कालावधीत अनेक नागरिकांना आपली नोकरी टिकण्याचे तसेच धंदा पुन्हा किमान पूर्ववत चालेल की नाही, अशा रोजीरोटीच्या समस्यांनी ग्रासले आहे. अशा प्रकारच्या ताणतणावांमुळे स्वास्थ्य बिघडते. त्यामुळे अनेक रोगांना निमंत्रण मिळते. त्यामुळे एप्रिल आणि मेचा पूर्ण महिना घरी थांबाव्या लागलेल्या नागरिकांनी किमान सकाळी तरी तासभर योगासने करण्यावर भर दिला.आॅनलाइन योगादेखील जोरातकाही योगशिक्षकांनी या कालावधीत आॅनलाइन योगा प्रशिक्षणाचेदेखील धडे दिले. अशा आॅनलाइन योग प्रशिक्षणांनादेखील खूप चांगला प्रतिसाद मिळत गेला. विशेष म्हणजे गत तीन महिन्यांत त्यात सातत्याने वाढ झाल्याने आॅनलाइन योगासने प्राणायाम शिकण्याचे प्रमाणदेखील खूप वाढले आहे.सध्याच्या कोरोनाच्या काळात तर प्रत्येक नागरिकासाठी योगासने आणि प्राणायाम अत्यंत आवश्यक बनले आहेत. या काळात नागरिकांनी फुप्फुसाची क्षमता वाढवणारी भुजंगासन, धनुरासन, उष्टÑासन यांसारखी योगासने अधिक उपयुक्त ठरू शकतील. तसेच प्राणायामात दीर्घ श्वसन, अनुलोम-विलोम, भ्रामरी, भस्त्रिका यांसारखे प्रकार प्रत्येकाला निरोगी ठेवण्यास अधिक सहाय्यभूत ठरतील.- विश्वास मंडलिक, योगाचार्य