शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मक्यावर अमेरिकन अळीचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 21:25 IST

पाटोदा : येवला तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून मका पीक लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. मका पिकावर सध्या अमेरिकन अळीचे नवीन संकट उभे राहिल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देशेतकऱ्यांसमोर नवे संकट : औषध फवारणीसाठी धावपळ; घास हिरावला जाण्याची भीती

गोरख घुसळे ।लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : येवला तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून मका पीक लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. मका पिकावर सध्या अमेरिकन अळीचे नवीन संकट उभे राहिल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध फवारणीसाठी शेतकरीवर्गाची धावपळ सुरू आहे. अगोदरच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. यावर फवारणी करण्यासाठी आर्थिक खर्च करावा लागत आहे. तालुक्यात यंदा मे महिन्यात मान्सूनपूर्व हजेरी लावल्याने शेतकरीवर्गाने शेती मशागतीची कामे पूर्ण करीत जून महिन्याच्या पहिल्या तीन दिवसात झालेल्या रोहिणी नक्षत्राच्या पावसावर मका पिकाची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली.कृषी विभागातर्फे शेतकºयांना मार्गदर्शनउगवण झालेल्या मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीने थैमान घातले असून, विविध उपाययोजना, औषध फवारणी करूनही अळी नियंत्रणात येत नसल्याने शेतकरीवर्ग त्रस्त झाला आहे. ताटात वाढलेला घास हिरावला जातो की काय, अशी चिंता शेतकरीवर्गाला सतावत आहे. अमेरिकन लष्करी अळी नियंत्रणात आणण्यासाठी काय उपाययोजना करावी याबाबत येवला तालुका कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतकरीवर्गाला मार्गदर्शन करीत आहेत.

मका लागवडीनंतर आठच दिवसात पीक पिवळे पडू लागले. त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर लष्करी अळीने थैमान घातले आहे. अळी नियंत्रणासाठी सुमारे आठ हजार रुपये खर्च करून दोन वेळेस औषध फवारणी केली मात्र अळी नियंत्रणात येत नाही.- संजय भवर, ठाणगाव

उत्पन्न तसेच जनावरांना चारा उपलब्ध होईल म्हणून शेतात मका पिकाची लागवड केली; मात्र पिकाच्या पोंग्याला लष्करी अळीने वेढले आहे. औषधांच्या महागड्या फवारण्या करूनही नियंत्रण येत नाही. शेतकरीवर्गाला दिलासा देण्यासाठी या अळीग्रस्त मका पिकाचे पंचनामे करून आर्थिक मदत करावी-ज्ञानदेव शेळके, ठाणगाव

मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. येवला कृषी विभागाच्या वतीने लष्करी अळीचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. एकात्मिक कीड व्यवस्थापन करण्यासाठी शेतकरीवर्गाला मार्गदर्शन केले जात आहे.- प्रकाश जवने, कृषी सहाय्यक, पाटोदा मंडळ

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी