शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेसाठी मतदार याद्यांची दुरुस्ती सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 18:50 IST

लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत व पाठोपाठ विधानसभा निवडणुकीच्या काळात अशाच प्रकारे राज्यात मोठ्या प्रमाणात मतदारांनी तक्रारी केल्या होत्या. निवडणूक यंत्रणेने परस्पर मतदार यादीतील नावे वगळल्याने अनेकांना मतदानापासून वंचित रहावे लागले होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात थेट न्यायालयात मतदारांनी धाव

ठळक मुद्देलोकसभेच्या तक्रारीची दखल : दुबार, मयत वगळणारआयोगाने मतदारांना १९५० हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी अनेक मतदान केंद्रांवर मतदारांना त्यांची नाव सापडली नाहीत, तर अनेकांची एकापेक्षा अधिक मतदान केंद्रांवर नावे असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याने या सर्व तक्रारींची दखल घेत येत्या विधानसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी निवडणूक विभागाने आत्तापासूनच मतदार यादी दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या संदर्भात सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दुबार व मयत मतदारांची नावे तत्काळ वगळण्याचे तर त्यांच्याकडे नाव नोंदणीचे पडून असलेल्या मतदारांच्या अर्जांचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत व पाठोपाठ विधानसभा निवडणुकीच्या काळात अशाच प्रकारे राज्यात मोठ्या प्रमाणात मतदारांनी तक्रारी केल्या होत्या. निवडणूक यंत्रणेने परस्पर मतदार यादीतील नावे वगळल्याने अनेकांना मतदानापासून वंचित रहावे लागले होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात थेट न्यायालयात मतदारांनी धाव घेण्याचा प्रकारही घडला होता. त्यानंतर मात्र निवडणूक आयोगाने मतदारांबाबत काटेकोरपणे काळजी घेण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांची खात्री करण्याबरोबरच त्यांचे एकापेक्षा अधिक मतदान केंद्रांवर नाव असेल तर त्याबाबत नोटीस बजावून एकाच मतदान केंद्रावर नाव असण्याचा आग्रह धरला होता. अर्थात हे सारे प्रयत्न कागदोपत्री ठरले. त्यानंतरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती झाली व आता लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीदेखील असाच अनुभव मतदारांना घ्यावा लागला. कदाचित मतदार यादीतील घोळ गृहीत धरूनच निवडणूक आयोगाने मतदारांना १९५० हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला होता. त्याद्वारे मतदाराला त्याचे मतदार यादीतील नाव व मतदान केंद्र शोधून देण्यात आले. ज्यांनी या सेवेचा लाभ घेतला त्यांची नोंद निवडणूक यंत्रणेने घेतली, परंतु मतदानाच्या दिवशी नाव सापडले नाही या कारणावरून अनेक मतदार मतदान केंद्रावरून परत गेले. परिणामी मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाने गेल्या काही महिन्यांपासून मतदार जागृती अभियान राबवूनही मतदानाचा टक्का वाढू शकला नाही. या संदर्भातील तक्रारी प्रामुख्याने नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघ, मालेगाव बाह्य व मालेगाव मध्य या सहा मतदारसंघांत करण्यात आल्या. त्यामुळे चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी निवडणूक यंत्रणेने दोन दिवसांपूर्वीच सर्व सहायक निवडणूक अधिकारी, नायब तहसीलदारांची बैठक घेऊन त्यांना याबाबतच्या सक्त सूचना केल्या. ज्यांनी लोकसभा निवडणुकीत तक्रारी केल्या त्यांची यादीच सोपविण्यात आली असून, त्या आधारे मतदार यादीची दुरुस्ती करण्यास सांगण्यात आले.

टॅग्स :Electionनिवडणूकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय