शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

अंबड औद्योगिक वसाहतीत अतिभाराने घंटागाडी उलटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 00:23 IST

अंबड औद्योगिक वसाहतीतील संचेती भगर मिलच्या कॉर्नरवर मंगळवारी (दि. १९) दुपारी ३ वाजेच्या सुमारास ओव्हरलोडेड घंटागाडी उलटल्याची घटना घडली. सुदैवाने त्यामध्ये कुणी जखमी झाले नाही. दरम्यान, ओला आणि सुका कचरा विलगीकरणामुळे ओल्या कचऱ्याच्या वजनामुळे गाडी एका बाजूला झुकून उलटल्याचे चालकाने सांगितले.

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील संचेती भगर मिलच्या कॉर्नरवर मंगळवारी (दि. १९) दुपारी ३ वाजेच्या सुमारास ओव्हरलोडेड घंटागाडी उलटल्याची घटना घडली. सुदैवाने त्यामध्ये कुणी जखमी झाले नाही. दरम्यान, ओला आणि सुका कचरा विलगीकरणामुळे ओल्या कचऱ्याच्या वजनामुळे गाडी एका बाजूला झुकून उलटल्याचे चालकाने सांगितले. मंगळवारी दुपारच्या सुमारास सिडको विभागातील घंटागाडी कचरा संकलन करून खतप्रकल्पावर जात असताना अंबड औद्योगिक वसाहतीतील संचेती भगर मिलच्या कॉर्नरवर ती उलटली. सुदैवाने या घंटागाडीत चालकासह असलेल्या कर्मचाºयांना कसलीही दुखापत झाली नाही. घंटागाडी ओव्हरलोडेड झाल्यामुळेच सदरची घटना घडल्याचे चालकाने सांगितले. महापालिकेने ओला आणि सुका कचरा विलगीकरण बंधनकारक केले आहे. घंटागाडीत ओला आणि सुका कचºयासाठी स्वतंत्र कप्पे करण्यात आलेले आहेत. त्यात ओल्या कचºयाचे वजन जास्त होत असल्याने घंटागाडी एका बाजूला झुकते. त्यामुळे बºयाचदा वळणावर चालकाला कमालीची काळजी घ्यावी लागते. सदर घंटागाडी ही पूर्णपणे कचºयाने भरलेली होती. जादा वजनामुळेच वळणावर गाडी उलटल्याची घटना घडली. ओल्या कचºयाचे प्रमाण जास्त असल्याने गाड्या चालविताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे चालकांनी सांगितले.कच-याचे टार्गेटएका फेरीत घंटागाडीत जास्तीत जास्त कचरा संकलित करून आणण्याचे टार्गेट चालक व कर्मचाºयांना ठेकेदारांकडून दिल्याचे समजते. त्यामुळे घंटागाडीच्या वारंवार फेºया मारण्याऐवजी कमीत कमी फेºयांमध्ये जास्तीत जास्त कचरा वाहून नेण्यासाठी कर्मचारी प्रयत्न करत असतात. त्यातूनच गाड्या ओव्हरलोडेड होऊन त्या घसरण्याचे अथवा उलटण्याच्या घटना घडत असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका