नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संसाराची व जिवाची पर्वा न करता अहोरात्र दलित, शोषित, पीडित समाजाच्या कल्याणासाठी स्वत:ला झोकून दिले. वंचितांना माणुसकीची वागणूक मिळून दिली; मात्र या वंचित समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीचा काळाच्या ओघात विसर पडला आहे, हे दुर्दैव आहे, असे प्रतिपादन भन्ते आर्यनाग यांनी केले.सिडको खुटवडनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुद्देशीय संस्थेच्या वतीने भाद्रपद पौर्णिमेनिमित्त आयोजित व्याख्यानाप्रसंगी भन्ते आर्यनाग बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसाद सूर्यवंशी, तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक संजय साबळे, विनोद भडांगे, रवि धिवरे, संजय भरीत आदि उपस्थित होते.यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंजाबराव कांबळे यांनी, तर प्रास्ताविक सदाशिव टेंबुर्णे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय गायकवाड, डॉ. सीताराम बच्छाव, प्रा. रखमाजी सुपारे, राजू गायकवाड, राहुल केदार, बबन वाघ, जयवंत नगराळे, संजय बिंदोड, दाणी आदिंनी परिश्रम घेतले.
‘आंबेडकरी विचारसरणीचा विसर’
By admin | Updated: October 4, 2015 22:33 IST