शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

अंबड पोलीस ठाणे अधिकार्‍याविना!

By admin | Updated: June 6, 2014 23:53 IST

सिडको : अत्यंत संवेदनशील असलेल्या अंबड पोलीस ठाण्यात निरीक्षकाचा पदभार प्रभारी म्हणून दुसर्‍या अधिकार्‍यास देण्यात आला आहे.

 

सिडको : अत्यंत संवेदनशील असलेल्या अंबड पोलीस ठाण्यात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा पदभार प्रभारी म्हणून दुसर्‍या अधिकार्‍यास देण्यात आला आहे. याठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची नेमणूक करणे गरजेचे असतानाही इंदिरानगरसारख्या कमी लोकसंख्या असलेल्या पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस म्हणून अधिकार्‍याची त्वरित नेमणूक करण्यात आली आहे; परंतु अंबड पोलीस ठाण्यास मात्र अजूनही प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.अंबड पोलीस ठाण्यात संपूर्ण सिडकोसह अश्विननगर, गोविंदनगर, खुटवडनगर, अंबड औद्योगिक वसाहत आदि मोठा परिसर आहे. विशेष म्हणजे, पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर्‍या, घरफोड्या होण्याबरोबरच महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी होण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. गेल्या दीड ते दोन महिन्यांपूर्वी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून सरदार पाटील यांची नेमणूक करण्यात आली होती; परंतु काही दिवसांतच पाटील सुट्टीवर गेले आहेत. त्यांच्या जागी अंबड पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक व्ही. डी. श्रीमनवार हे प्रभारी म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा पदभार सांभाळत होते. त्यांची नुकतीच इंदिरानगर येथील पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली आहे; परंतु अंबड पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची अजूनही नेमणूक करण्यात आलेली नसल्याने सध्या श्रीमनवार हेच प्रभारी म्हणून काम बघत आहेत.अंबड पोलीस ठाणे हे अत्यंत संवेदनशील पोलीस ठाणे म्हणून ओळखले जात असून, या पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक असणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)