शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

अंबड पोलीस ठाणे हद्दीत चार घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 00:56 IST

सिडको व अंबड भागात घरफोडीचे सत्र सुरूच आहे. परिसरात झालेल्या चार घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे साडेसहा लाखांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसाडेसहा लाखांचा ऐवज लुटला : घरासह, कारखाना टार्गेट

सिडको : सिडको व अंबड भागात घरफोडीचे सत्र सुरूच आहे. परिसरात झालेल्या चार घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे साडेसहा लाखांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जुने सिडको, खोडे मळा येथील रहिवासी संतोष जोशी यांनी दिलेल्या फिर्याद म्हटले आहे की, आम्ही गावाला गेलो असल्यामुळे घराला कुलूप होते. चोरट्यांनी संधी साधत घरफोडी करून कपाटात ठेवलेले मंगळसूत्र साडेसात तोळ्याची सोन्याची चेन, नेकलेस असा दोन लाख पंचवीस हजार रु पये किमतीचे दागिने चोरून नेले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक म्हात्रे करीत आहेत.दुसरी घटना रायगड चौकात घडली. राहुल तागड यांनी पोलिसांत फिर्याद दिली. शनिवारी (दि.१२) रात्री घराचा पहिल्या मजल्यावरील दरवाजा उघडा होता. चोरट्यांनी त्या मार्गे प्रवेश करून घरातील लॅपटॉप व मोबाइल असा १ लाख ६४ हजार रु पये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अंबड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार खांडेकर करीत आहेत.तिसऱ्या घटनेत दत्त चौकातील बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सोन्या चांदीचे ६८ हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केल्याची घटना शुक्र वारी (दि. ११) रात्री नवीन नाशिकच्या दत्त चौक परिसरात घडली.याप्रकरणी अनिता पंढरी वाघ (रा. दत्तचौक, नवी नाशिक) यांनी तक्र ार दाखल केली आहे. त्यानुसार शुक्र वारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. लोखंडी कपाटातील सोन्याचे तसेच चांदीचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चौथ्या घटनेत अंबड औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीच्या आवारातून चोरट्यांनी १ लाख ८३ हजार ७८० रुपयांचे कास्टिंग पार्टचे ३० नग चोरी केल्याची घटना शुक्र वारी (दि.११) रात्री घडली. याप्रकरणी तिशन इस्तीयाक सैयद (रा. डीजीपीनगर, कामठवाडा) यांनी तक्र ार दाखल केली आहे. त्यानुसार त्यांची औद्योगिक वसाहतीत ईएमएस इंजिनिअरिंग वर्कस नावाची कंपनी आहे. या ठिकाणी कंपनीच्या आवारात कासटिंग कम्पोनंट पशिनीचे पार्ट तयार करण्यासाठी लागरे कास्टिंगचे ३० पार्ट ठेवण्यात आले होते. चोरट्यांनी हे पार्ट लंपास केले.याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी