शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

नाशिकच्या अंबड लिंकरोडवर भंगार बाजार पुन्हा वसण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 11:37 IST

नाशिक : सातपूर-अंबड लिंकरोडवरील भंगार बाजार हटविण्याची कारवाई महापालिकेने केली असली तरी, पुन्हा एकदा भंगार बाजार वसण्याची भीती प्रभागाचे नगरसेवक भागवत आरोटे यांनी आयुक्तांकडे एका पत्रान्वये केली आहे. सदर भागात बांधकामांना देण्यात येणाºया परवानग्या तपासण्याचीही मागणी आरोटे यांनी केली आहे.आयुक्तांना दिलेल्या पत्रात आरोटे यांनी म्हटले आहे, सद्यस्थिती पाहता मागील दाराने ...

ठळक मुद्देपुन्हा एकदा भंगार बाजार वसण्याचा धोका 

नाशिक : सातपूर-अंबड लिंकरोडवरील भंगार बाजार हटविण्याची कारवाई महापालिकेने केली असली तरी, पुन्हा एकदा भंगार बाजार वसण्याची भीती प्रभागाचे नगरसेवक भागवत आरोटे यांनी आयुक्तांकडे एका पत्रान्वये केली आहे. सदर भागात बांधकामांना देण्यात येणाºया परवानग्या तपासण्याचीही मागणी आरोटे यांनी केली आहे.आयुक्तांना दिलेल्या पत्रात आरोटे यांनी म्हटले आहे, सद्यस्थिती पाहता मागील दाराने पुन्हा एकदा भंगार बाजार वसण्याचा धोका निर्माण झाला आहे. सदर भागात अनेक भूखंडांवर बांधकामाची परवानगी घेऊनही अनेकांनी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतलेला नाही. संबंधित इमारतींचे बांधकाम नकाशे तपासल्यास काही इमारती या मनपाने दिलेल्या परवानगीनुसार बांधलेल्या नाहीत तसेच काही इमारतींचा वापर अनधिकृतपणे भंगार बाजारासाठी होताना दिसून येत आहे. अनेकांनी इमारतींमध्ये भंगार बाजाराची दुकाने थाटलेली आहेत, तर काही ठिकाणी मोकळ्या भूखंडांवर कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता अनधिकृतपणे भंगार साहित्याचे दुकाने सुरू आहेत. प्रशासनातील काही अधिकारी व नगररचना विभागाच्या दुर्लक्षामुळेच पुन्हा भंगार बाजार वसण्याचा धोका निर्माण झाला आहे. आयुक्तांनी भंगार बाजाराच्या ठिकाणी देण्यात आलेल्या बांधकाम परवानग्यांसंबंधीचा अहवाल मागवून चौकशी करावी आणि कारवाई करावी, अशी मागणीही आरोटे यांनी केली आहे.