शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

निसर्गरम्य वातावरणात भरला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 13:13 IST

पेठ : विद्यार्थी दशेनंतर घेतलेला अध्यापक महाविद्यालयात प्रवेश,त्यानंतर पत्करलेली शिक्षकाची नोकरी आणि कुटूंबव्यवस्थेत अडकलेल्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २८ वर्षानंतर पुन्हा एकदा त्या अध्यापक विद्यालयाला भेट देऊन आठवणी जाग्या केल्या.

पेठ : विद्यार्थी दशेनंतर घेतलेला अध्यापक महाविद्यालयात प्रवेश,त्यानंतर पत्करलेली शिक्षकाची नोकरी आणि कुटूंबव्यवस्थेत अडकलेल्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २८ वर्षानंतर पुन्हा एकदा त्या अध्यापक विद्यालयाला भेट देऊन आठवणी जाग्या केल्या.रत्नागिरी जिल्हयातील निसर्गरम्य अशा आबलोली येथील अध्यापक विद्यालयात सन १९९२ च्या बॅचमध्ये राज्यभरातून विद्यार्थी -विद्यार्थीनींनी प्रवेश घेतला. शिक्षकी पेशाला आवश्यक असणारी पदवी प्राप्त करून आपआपल्या जिल्ह्यात स्थायिक झालेले हे माजी विद्यार्थी पुन्हा एकदा एकत्र झाले. पन्नाशीची उमर गाठली असतांनाही महाविद्यालयात दाखल होतांना सर्वच भूतकाळाच्या आठवणीत रममाण झाले. अंत्यत प्रतिकूल परिस्थितीत गावापासून कोसो दूर शिक्षण घेत सर्वच मित्र मैत्रिण नोकरी, व्यवसाय व शेती क्षेत्रात स्थिरावलेले यावेळी दिसून आले.प्रा. भारत शिंदे,प्रा. नारायण माळवे या आपल्या त्या काळातल्या गुरूजनांना वंदन करून सर्व विद्याथ्र्यांनी त्यांचे आशिर्वाद घेतले. सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या मित्रांनी अतिशय भावनिकतेला साद घालत आपला जीवनपट उलगडला. चतुर्थ श्रेणी कर्मचारी प्रभाकर गुरव यांचा माजी विद्यार्थ्यांच्या वतीने महावस्त्र प्रदान करून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी नानासाहेब सोनवणे , गणेश नार्वेकर ,शशिकांत अमृतकर,रमेश चव्हाण ,गुलाबराव पाटील,धनावडे ,दिपा बाईत,मनिषा सावंत, सुधिर उर्कार्डे, प्रमोद काजरोळकर,गोपाळ ढोरे,पल्लवी लेले,सरला पवार ,शशिकांत बागूल,स्वाती मोहित,गीता रेपाळ,अंजली आंग्रे,सुभाष मायंगडे,जयवंत सावंत यांचे सह शिक्षक विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.शशिकांत बागूल यांनी सुत्रसंचलन तर दिनेश नेटके यांनी आभार मानले.

टॅग्स :Nashikनाशिक