शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सुगरणींची घरटे बनविण्याची लगबग...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 00:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव निंबायती : खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा पाखराची कामगिरी जरा देख रे मानसा ! अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला ! या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेच्या ओळींचा प्रत्यय सध्या रानोमाळी येत आहे. सध्या विणीचा हंगाम सुरू असल्याने झाडांच्या उंच उंच शेंड्यांवर, तर पाण्यात डोकावणाऱ्या फांद्यांवर मनमोहक जाळीदार नक्षीकाम केलेले घरटे विणण्यात सुगरण पक्षी सध्या मग्न असलेला आपल्याला पहावयास मिळत आहेत.

ठळक मुद्देमालेगाव : पाखराची कामगिरी जरा देख रे मानसा..; मनमोहक जाळीदार नक्षीकामाचे आकर्षण

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव निंबायती :खोपा इनला इनलाजसा गिलक्याचा कोसापाखराची कामगिरीजरा देख रे मानसा !अरे खोप्यामधी खोपासुगरणीचा चांगलादेखा पिलासाठी तिनंझोका झाडाले टांगला !या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेच्या ओळींचा प्रत्यय सध्या रानोमाळी येत आहे. सध्या विणीचा हंगाम सुरू असल्याने झाडांच्या उंच उंच शेंड्यांवर, तर पाण्यात डोकावणाऱ्या फांद्यांवर मनमोहक जाळीदार नक्षीकाम केलेले घरटे विणण्यात सुगरण पक्षी सध्या मग्न असलेला आपल्याला पहावयास मिळत आहेत.पावसाळ्याच्या दिवसात विणीच्या हंगामात सुगरण पक्ष्यातील नर पक्षी मजबूत घरटे बांधतो; पण हे घरटे अर्धवट बांधलेले असते. सुगरण पक्षी पंख फडफडवीत आवाज काढत मादीला साद देऊन घरटे पहावयास बोलवतो. मादीला आकर्षित करण्यासाठी एकाच झाडावर नर पक्षी दोन ते तीन घरटे तयार करतो. मादी अर्धवट घरटे न्याहाळते व त्यातील त्यांना योग्य वाटणारे घरटे निवडून घरट्याचे राहिलेले अपूर्ण वीणकाम ती नरासोबत पूर्ण करते. म्हणून आपणास अनेक ठिकाणी काही पूर्ण झालेली तर काही अर्धवट घरटी दिसतात. अर्धवट राहिलेली घरटी नाकारलेली असल्याचे समजते.पर्यायाने हे घरटे तयार करणारा नर पक्षीदेखील मादीने नाकारल्याचे मानले जाते. गवताच्या पात्याचा एक-एक तोडा इवल्याशा चोचीने काढून त्याची सुबक अशी जाळीदार रचना करून आकर्षक घरटे बांधले जाते. सुगरण मादी घरट्यात एकावेळी सहा ते सात अंडे घालते. साधारणत: पंधरा ते वीस दिवसात घरट्यातून पिल्ले बाहेर डोकावू लागतात. सुमारे महिनाभर सुगरण पक्ष्यांचा हा परिवार त्या परिसरात राहतो व नंतर उडून जातो. पुन्हा घरट्याकडे ते परत फिरून येत नाही. चिमण्याप्रमाणे सुगरण पक्षीदेखील वर्षभर झाडावरच राहतो. सुगरणीचा खोपा ऊन, वारा, वादळ, पावसातही तग धरून वाºयाच्या झोताबरोबर हेलकावत राहतो. सुगरण हा वसाहत करून समूहाने राहणारा पक्षी असल्याने एकाच झाडावर त्यांची २० ते २५ घरटी दिसतात. पक्ष्यांच्या दुनियेत घरटेबांधणीच्या क्षेत्रात अनेक गृहरचनाकार पक्षी या कलेत माहीर आहेत. त्यात सुगरण, सुतार, गरुड, मधमाशी आदी उदाहरणे देता येतील. यांच्यासारखी घरटी कुणालाच बांधता येणार नाहीत. मात्र सुगरणीचे घरटे म्हणजे कारागिरीचा एक कळसच म्हटला पाहिजे.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यforestजंगल