शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

देवगावी आवणीच्या कामांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 00:26 IST

देवगाव : जुलैच्या सुरुवातीपासूनच होत असलेल्या दमदार बरसणाऱ्या पावसामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आवणींच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र,कोरोनाच्या भीतीने मजुरच मिळत नसल्याने शेतीची कामे संथगतीने होत असून लावणीची कामे रखडून रोपांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

देवगाव : जुलैच्या सुरुवातीपासूनच होत असलेल्या दमदार बरसणाऱ्या पावसामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आवणींच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र,कोरोनाच्या भीतीने मजुरच मिळत नसल्याने शेतीची कामे संथगतीने होत असून लावणीची कामे रखडून रोपांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.देवगाव परिसरासह वावीहर्षे, टाकेदेवगाव, येल्याचीमेट, श्रीघाट, चंद्राचीमेंट, डहाळेवाडी,टाकेहर्षे या भागात दमदार पावसामुळे आवणींच्या कामाला सुरुवात झाली असून मजूर टंचाईमुळे शेतीच्या कामांना ब्रेक लागला आहे. इगतपुरी तालुक्यातील नांदडगाव, वांजळे, कोरोळे या भागातून शेतकरी वाडीपाड्यातील मजूर घेऊन जात असल्यामुळे मजुरांची उणीव भासत आहे. त्यात दरवर्षीच्या तुलनेत मजुरीत वाढ केल्याने शेतकºयांत चिंता व्यक्त होत आहे. दरदिवसाला २५० रुपये मजुरी होती. परंतू, लॉकडाऊनच्या काळात मजूर मिळत नसल्याने आता ३०० रुपये मजुरी झाली आहे. मजुरी वाढल्याने शेतकरी हवालदिल झाला असून घरच्या उपलब्ध मनुष्यबळाच्या साहाय्याने शेतीच्या कामांवर जोर दिला जात आहे.देवगाव परिसरात नागली, वरई, भात या मुख्य पिकांसह कोलम,एक हजार आठ, रुपाली, सोनम,एक हजार दफ्तरी या भातांच्या जातीची लागवड केली जाते. उशिरा पण समाधानकारक पाऊस पडत असल्याने व वेळेवर शेतकºयांनीपेरणी केल्यामुळे भात लावणीस सुरुवात झाली आहे. तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर देवगाव परिसरातील सर्वच खेड्यापाड्यांत लावणीच्या कामांना वेग आला आहे.------------------दरवर्षीप्रमाणे भात आवणीसाठी पन्नास ते साठ मजूर घेत होतो.परंतू, चालुवर्षी लॉकडाऊनमूळे मजुरी वाढल्याने मजूर टंचाई निर्माण झाली आहे. मजुरी वाढल्याने व मजूर मिळत नसल्याने घरातील उपलब्ध माणसांना घेऊन आवणी करावी लागत आहे.- दिलीप शिंदे, शेतकरी, देवगाव.--------------लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यापासून हाताला काम नव्हते. परंतु, पाऊस वेळेत पडल्याने भात लावणीस सुरवात झाली. त्यामुळे काम मिळू लागल्याने हाती दोन पैसे मिळतील. मजुरी वाढवल्याने नक्कीच समाधान झाले आहे.- सुरेखा दोंदे, मजूर, देवगाव

टॅग्स :Nashikनाशिक