शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या सावटाखाली खरिपाची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 23:03 IST

जळगाव नेऊर : कृषीसंबंधातील सर्व बाबींना लॉकडाउनमधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे खते, बी-बियाणे व किटकनाशक खरेदीतील अडचण दूर झाली आहे. परंतु कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच असल्याने कोरोनाच्या सावटाखाली खरिपाची लगबग सुरू झाल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.

जळगाव नेऊर : कृषीसंबंधातील सर्व बाबींना लॉकडाउनमधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे खते, बी-बियाणे व किटकनाशक खरेदीतील अडचण दूर झाली आहे. परंतु कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच असल्याने कोरोनाच्या सावटाखाली खरिपाची लगबग सुरू झाल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.सन २०१९ चा खरीप पाऊस व अवकाळीने गेला. रब्बी पिकालाही सतत मार्केट बंदमुळे विक्र ीस अडचणी येत आहे. शिवाय माल विक्रीस नेला तर त्यास समाधानकारक दर मिळत नसल्याने त्यातून खर्चही निघत नाही. येणाऱ्या खरीप हंगामावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या शेतकरी मशागतीच्या कामात गुंतले आहेत. साधारणत: मे महिन्याच्या शेवटी शेतकरी खते आणि बियाणांच्या खरेदीसाठी कृषी केंद्रांवर येत असतात. तसेच बरेच शेतकरी टोमॅटो लागवडीसाठी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर नर्सरीकडे रोपे बुक करण्यासाठी धाव घेतात. परंतु महिनाभरात महाराष्ट्र कोरोनामुक्त होईल का, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आला आहे. पेरणी हंगाम जवळ आल्याने भीतीच्या सावटाखाली शेतकरीवर्गाची लगबग सुरू आहे.चालू हंगामात ७ जूनलाच पावसाचे आगमन होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानुसार वेळेवर पाऊस आल्यास पाण्याची चिंता मिटणार आहे. मात्र मे महिन्यात कोरोना आटोक्यात आला नाही, तर शेती व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.--------साहित्य खरेदीसाठी कसरतशेतक-याला अनेक ठिकाणी शेतीस लागणारे साहित्य व माल विक्र ीस बाहेर पडावे लागते व शेतावर विविध ठिकाणांहून मजूर आणावे लागतात.  गावाबाहेर जावे लागत असले तरी योग्य ती काळजी घेऊन अंतर ठेवून मार्ग काढण्याचा प्रयत्न शेतकरी करताना दिसत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक