शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या सावटाखाली खरिपाची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 00:12 IST

जळगाव नेऊर : कृषी संबंधातील सर्व बाबींना लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदीची अडचण येणार नाही. परंतु कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदीकरिता शहरात जावे लागते, परिणामी शेतकऱ्याला आताच्या खरिपासाठी लागणारे भांडवल तो शेतमाल विकूनच उभे करणे जिकिरीचे होत आहे.

ठळक मुद्देजळगाव नेऊर : बळीराजाला पडली भांडवलाची चिंता

जळगाव नेऊर : कृषी संबंधातील सर्व बाबींना लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदीची अडचण येणार नाही. परंतु कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदीकरिता शहरात जावे लागते, परिणामी शेतकऱ्याला आताच्या खरिपासाठी लागणारे भांडवल तो शेतमाल विकूनच उभे करणे जिकिरीचे होत आहे.

२०२० चा खरीप, रब्बी हंगाम कोरोनाच्या सावटाखाली गेल्याने २०२१ या वर्षातही कोरोनामुळे शेतकरी चिंतेत आहे.बाजार समित्या कधी बंद, तर कधी चालू यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीस अडचणी येत आहे. शिवाय माल विक्रीस नेला तर त्यास भाव भेटत नसल्याने येणारा २०२१ खरीप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या शेतकरी मशागतीच्या कामात गुंतले आहेत. शेतकऱ्यांची कांदा काढणी, साठवणूक शेती कामे अंतिम टप्प्यात असून शेतीच्या मशागतीला वेग आला आहे.साधारणत: मे महिन्याच्या शेवटी शेतकरी खते आणि बियाणांच्या खरेदीसाठी कृषी केंद्रांवर येत असतात. तसेच बरेच शेतकरी टोमॅटो लागवडीसाठी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शेतकरी अनेक नर्सरीकडे रोपे बुक करण्यासाठी धाव घेतात.परंतु येत्या काही दिवसात महाराष्ट्र कोरोनामुक्त होईल का असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आला असून पेरणी हंगाम जसजसा जवळ येत आहे तसतशी शेतकरी वर्गाची लगबग सुरू झाली आहे. चालू हंगामात हवामान खात्याच्या अंदाजानुसार १ जूनलाच पावसाचे केरळात आगमन होईल, असे वर्तविले असून पाऊस वेळेवर झाल्यास पाण्याची चिंता जरी मिटली तरी कोरोना आटोक्यात आला नाही, तर शेती व्यवसायावर खूप मोठा परिणाम होण्याची शक्यता शेतकरी वर्गातून वर्तविली जात आहे.शेतीत जरी फारशी भीती नसली तरी शेतकऱ्याला अनेक ठिकाणी शेतीस लागणारे साहित्य व माल विक्रीस बाहेर पडावे लागते व शेतावर विविध ठिकाणांहून मजूर आणावे लागते, त्याच्यामुळे ही कोरोनाची भीती वाढत आहे. अशा संकटात शेतकरी सापडला आहे. तरीही योग्य ती काळजी घेऊन, अंतर ठेवून मार्ग काढण्याचा प्रयत्न शेतकरी करताना दिसत आहे.(०८ जळगाव नेऊर)जळगाव नेऊर येथे शेतात सुरू असलेली नांगरणी.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी