शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे बिनविरोध वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 19:34 IST

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड २ जानेवारी रोजी तर दुसऱ्याच दिवशी विषय समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात आली होती. मात्र या पदाधिकाऱ्यांना समित्यांचे वाटप करण्यात न आल्याने त्यासाठी मंगळवारी विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली होती.

ठळक मुद्देगायकवाड : बांधकाम, बनकर : कृषी तर दराडेंकडे शिक्षण, आरोग्य

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या सभापतींना विषय समित्यांचे वाटप व विषय समित्यांच्या रिक्त असलेल्या सदस्यांच्या जागा मंगळवारी विशेष सर्वसाधारण सभेत बिनविरोध वाटप करण्यात आल्या. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड यांना अर्थ व बांधकाम तर संजय बनकर यांना कृषी व पशुसंवर्धन समिती तसेच सुरेखा दराडे यांना शिक्षण व आरोग्य समिती देण्यात आल्याची घोषणा अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी केली. या सभेत विषय समित्यांच्या ३१ रिक्त जागांपैकी २८ जागांवर सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड २ जानेवारी रोजी तर दुसऱ्याच दिवशी विषय समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात आली होती. मात्र या पदाधिकाऱ्यांना समित्यांचे वाटप करण्यात न आल्याने त्यासाठी मंगळवारी विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली होती. त्यासाठी सकाळी अकरा वाजेपासून विषय समित्यांसाठी नामांकन दाखल करण्याचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. प्रत्यक्षात दुपारी दोन वाजता सभेचे कामकाज सुरू होऊन विषय समित्यांचे वाटप होणे अपेक्षित असले तरी, स्थायी समितीसह बांधकाम व अर्थ समितीवर सदस्य म्हणून जाण्यासाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने त्या संदर्भातील तडजोडी, गुप्त बैठका व डावपेच आखण्यातच अधिक वेळ गेला. बैठकांवर बैठका होऊनही एकमत होत नसल्याने सभेच्या कामकाजाची वेळ पुढे ढकलावी लागली. अखेर दुपारी तीन वाजता सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. त्यात प्रारंभी सभापतींना विषय समित्यांचे वाटप करण्यात आले. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी तशी घोषणा केली. त्यात उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड यांना अर्थ व बांधकाम समिती, संजय बनकर यांना कृषी व पशुसंवर्धन तर सुरेखा दराडे यांना शिक्षण व आरोग्य समिती देण्यात आली.पदाधिकाºयांना समित्यांचे वाटप करण्यात आल्यानंतर स्थायी समितीच्या दोन रिक्त असलेल्या जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र दोन जागांसाठी ज्ञानेश्वर जगताप, लता विलास बच्छाव, छाया गोतरणे व महेंद्र काले या चौघांचे अर्ज दाखल झाल्याने त्यातील जगताप व बच्छाव यांनी माघार घेतल्याने गोतरणे, काले यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या दोन जागांसाठीदेखील चौघांनी अर्ज दाखल केले होते. त्यात लता बच्छाव व मनीषा पवार या दोघांनी माघार घेतल्याने दीपक शिरसाठ व यशवंत शिरसाठ या दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद