शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

किशोरवयीन मुलींना माफक दरात सॅनेटरी नॅपकिनचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 01:26 IST

नाशिक : ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीमधील स्वच्छतेविषयी घ्यावयाच्या काळजीबद्दल जनजागृती करण्याबरोबरच गावपातळीवर माफक दरामध्ये सॅनेटरी नॅपकिन आशामार्फत उपलब्ध करून देण्याचा निर्णय राष्टÑीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्दे राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम समन्वय समितीची सभा

नाशिक : ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीमधील स्वच्छतेविषयी घ्यावयाच्या काळजीबद्दल जनजागृती करण्याबरोबरच गावपातळीवर माफक दरामध्ये सॅनेटरी नॅपकिन आशामार्फत उपलब्ध करून देण्याचा निर्णय राष्टÑीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला.आरोग्य विभागांतर्गत मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजना अंतर्गत राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम समन्वय समितीची सभा मंगळवारी जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या मार्गदर्शनानुसार व जिल्हा परिषद आरोग्य सभापती यतींद्र पगार यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या योजनेमार्फत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सॅनेटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याच्या सूचना यतींद्र पगार यांनी यावेळी दिल्या. या बैठकीत आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असणाऱ्या मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजनेबाबत चर्चा करण्यात आली. तसेच सॅनेटरी नॅपकिनचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत सहा रुपये किमतीत सॅनेटरी पॅड उपलब्ध करून देण्यात येत आहे. अति जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळवे यांनी याबाबत सविस्तर माहिती देताना एकूण लोकसंख्येमध्ये किशोरवयीन मुलींची संख्या अंदाजे १० ते ११ टक्के एवढी असल्याचे सांगत, जिल्ह्णासाठी १ लाख ६४ हजार ८०० सॅनेटरी नॅपकिनची पाकिटे सर्व तालुक्यांमध्ये गाव पातळीवर आशांमार्फत अल्पदरात उपलब्ध करण्यात आली आहे. असून १,५०,१०० किशोरवयीन मुलींनी याचा लाभ घेतला असल्याचे सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डेकाटे यांनी ग्रामीण भागात या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी समितीची सभा ही दर महिन्याला जिल्हा तसेच तालुका स्तरावर घेण्यात यावी, असे निर्देश दिले. सभेस जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉक्टर रवींद्र चौधरी यांच्यासह विविध विभागांचे पंधरा समिती सदस्य उपस्थित होते.