नाशिक : मनसेची झालेली होरपळ, कॉँग्रेस व राष्ट्रवादीला लागलेली घरघर यामुळे सध्या चलनी नाणे म्हणून सेना-भाजपाकडे इच्छुकांचा जास्त ओढा असला तरी यदाकदाचित उभयतांमध्ये युती झालीच तर अनेकांना आपले उमेदवारीचे पतंग कटण्याची भीती वाटत आहे. त्यातूनच अनेक इच्छुकांनी उमेदवारीसाठी देव पाण्यात ठेवत वरिष्ठ स्तरावर फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.महापालिका निवडणुकीत खरी लढत शिवसेना व भाजपा या दोन्ही पक्षांमध्येच पाहावयास मिळणार असल्याचे आजचे तरी चित्र आहे. केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपाला नगरपालिका निवडणुकांमध्ये निर्भेळ यश लाभल्याने आणि त्याखालोखाल शिवसेनेही बऱ्यापैकी यश संपादन केल्याने येत्या महापालिका निवडणुकीतही सेना - भाजपाला सत्तेचे वेध लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवरच गेल्या वर्षभरात जेवढी पक्षांतरे झाली ती सर्व सेना-भाजपाच्या प्रवाहात जाऊन मिसळली आहेत.
युतीशी जडली प्रिती; पतंग कटण्याची भीती
By admin | Updated: January 14, 2017 00:50 IST