शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या मनसेत नाही ऑल इज वेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 01:23 IST

नाशिक- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नव्याने उभारी घेण्याची तयारी गेल्या वर्षी सुरू असतानाच अचानक सुरू झालेले फेरबदल अनेकांना आश्चर्य चकीत करणारे ठरत आहेत. विशेषत: मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या दौऱ्यात नाशिकमध्ये खूप काही घडले नाही. मात्र एकापाठोपाठ असे दोन संघटनात्मक बदल झाल्याने पक्षात यानिमित्ताने ह्यऑल इज नॉट वेलह्णची प्रचीती आली आहे. इतकेच नव्हे तर दोन छोटे बदल झाल्यानंतर आता पुढील विकेट कोणाची पडणार अशीही चर्चा सुरू झाली आहे.

ठळक मुद्देफेरबदलांमुळे चर्चाअनेकांना अर्धचंद्र मिळणार

नाशिक- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नव्याने उभारी घेण्याची तयारी गेल्या वर्षी सुरू असतानाच अचानक सुरू झालेले फेरबदल अनेकांना आश्चर्य चकीत करणारे ठरत आहेत. विशेषत: मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या दौऱ्यात नाशिकमध्ये खूप काही घडले नाही. मात्र एकापाठोपाठ असे दोन संघटनात्मक बदल झाल्याने पक्षात यानिमित्ताने ह्यऑल इज नॉट वेलह्णची प्रचीती आली आहे. इतकेच नव्हे तर दोन छोटे बदल झाल्यानंतर आता पुढील विकेट कोणाची पडणार अशीही चर्चा सुरू झाली आहे.राज्यात एकमेव सत्ता मिळालेल्या गेलेल्या नाशिक महापालिकेतील सत्ता गमविल्यानंतर आता पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी राज ठाकरे उत्सुक असल्याचे सांगण्यात येते. नाशिक महापालिकेचीअवघ्या दहा महिन्यांनी निवडणूक होणार आहे. त्यामुळे अन्य राजकीय पक्षांबरोबर मनसेने अंग झटकून कामाला सुरूवात केली असली तरी या पक्षाची संघटनात्मक कामाची तयारी तशी नाही, उलट एकमेकांच्या कुरघोड्या आणि त्यातून होणारे फेरबदल हा चर्चेचा विषय ठरला आहे. मध्यंतरी पक्षातील तरूण तुर्कांनी काही ज्येष्ठांच्या मक्तेदारी विषयी तक्रारी केल्यानंतर तरी राज यांच्या नाशिक दौऱ्यात काही तरी मोठा संदेश दिला जाईल अशी अपेक्षा होती. परंतू निवडक पदाधिकाऱ्यांची एक औपचारीक बैठक सोडली तर गर्दी करणाऱ्यांच्या हाती फार काही लागले नाही.राजदूत घडवण्याची नवी संकल्पना राज ठाकरे यांनी नाशिक दौऱ्यात मांडली. त्यानंतर दोन पदाधिकारी नाशिकमध्ये येऊन राजदूत संकल्पनेविषयी मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले गेले. परंतु पुढे काहीच झाले नाही. उलट त्यानंतर सचिन भोसले आणि संदीप भंवर यांची पदे काढून घेतल्याने नवीन काहीच नाही उलट जुन्यातच फेरबदल सुरू झाल्याचे दिसले. अर्थात हे फेरबदल दिसायला फार महत्वाचे वाटत नसले तरी बदल झाल्यानंतर चर्चा तर होणारच...! आता आणखी काही एक दोन नंबर लागणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे वरवर शांत वाटत असले तरी मनसेत अंतर्गत खदखद कायम असल्याचे सांगितले जात आहे.पक्षातील गटबाजी हे पक्षाचे जिवंतपणाचे लक्षण असल्याचे नेहेमीच काही ज्येष्ठ नेते बोलून गेले आहेत. मात्र असा जिवंतपणा विरोधी पक्षांना नामोहरम करण्यापेक्षा स्वपक्षीयांच्या विरोधात असेल तर फार काही वावगे होणार नाही. पक्षात सध्या दोन नेत्यांचे उघड गट असून बहुतांश पदाधिकाऱ्यांची त्यात विभागणी झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे तटस्थतेला तर वावच नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे महापालिकेच्या आगामी निवडणूकीत ही गटबाजी मोडीत काढण्याचे खरे आव्हान पक्षासमोर आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणMNSमनसे