शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

पुरात तिघे जण बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 01:51 IST

मित्रांसोबत पोहण्यासाठी गोदापात्रात सूर मारणारा पंचवटी परिसरातील युवक सोमवारी (दि.५) दुुपारी साडेचार वाजेच्या सुमारास वाहून गेल्याचे उघडकीस आले. तसेच लाखलगाव येथे पाय घसरून एक इसम गोदावरीच्या पुरात वाहून गेला. रविवारी दुपारच्या सुमारास नासर्डी नदीपात्रात वाहून गेलेल्या शिवाजीवाडीमधील इसमाचाही अद्याप थांगपत्ता लागू शकला नाही. पुराच्या पाण्यात एकूण तिघे वाहून गेले आहेत. याबाबत विविध पोलीस ठाण्यांत नोंद करण्यात आली आहे.

नाशिक : मित्रांसोबत पोहण्यासाठी गोदापात्रात सूर मारणारा पंचवटी परिसरातील युवक सोमवारी (दि.५) दुुपारी साडेचार वाजेच्या सुमारास वाहून गेल्याचे उघडकीस आले. तसेच लाखलगाव येथे पाय घसरून एक इसम गोदावरीच्या पुरात वाहून गेला. रविवारी दुपारच्या सुमारास नासर्डी नदीपात्रात वाहून गेलेल्या शिवाजीवाडीमधील इसमाचाही अद्याप थांगपत्ता लागू शकला नाही. पुराच्या पाण्यात एकूण तिघे वाहून गेले आहेत. याबाबत विविध पोलीस ठाण्यांत नोंद करण्यात आली आहे.याबाबत अग्निशमन दलाच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, पंचवटी फुलेनगर परिसरातील राहुल गवारे, प्रवीण चौधरी, रोहित उफाडे आणि आकाश शिवा लोंढे (१९, रा. फुलेनगर) हे चौघे मित्र पूर बघण्यासाठी आले होते. यावेळी चौघांनी नदीपात्रात पोहण्यासाठी संत गाडगे महाराज पुलाच्या रेलिंगवरून उडी घेतली. यावेळी चौघे पाण्याच्या प्रवाहात वाहत गेले, मात्र आकाशला पाण्याचा अंदाज आला नाही अन् तो टाळकुटेश्वर पुलाखालून पुढे वाहून गेला.पुलाखालून वाहून जाताना काहींनी आकाशला बघितल्याचेही सांगितले. एका राहुल नावाच्या युवकाने त्याला कन्नमवार पुलापर्यंत वाहत जाताना पाहिले. दरम्यान, टाळकुटेश्वर पुलापासून पंचवटी अमरधामपर्यंत गर्दी जमली. अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी पोहचला दुसऱ्या घटनेत लाखलगाव जवळील कालवी गावतील परशराम काशीनाथ अनवट (४७) यांचा पाय नदीकाठालगत घसरून तोल गेल्याने ते पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्यांचाही उशिरापर्यंत शोध लागला नाही. यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, दोन भाऊ, भावजया असा परिवार आहे. तसेच नासर्डी नदीकाठालगतच्या शिवाजीवाडी घरकुल प्रकल्पामधील रहिवासी संजय एकनाथ वल्हाड (४०) हे नासर्डीच्या पुरात रविवारी दुपारी वाहून गेले आहे.गोदाकाठावर आईचा टाहो...पुरात कोण पोहणार? याची चढाओढ लागली अन् एकापाठोपाठ चौघा मित्रांनी दुथडी वाहणाºया गोदापात्रात उडी घेतली. तिघांना पिंपळपारापर्यंत नदीकाठ गाठणे शक्य झाले, मात्र सर्वात अगोदर उडी घेतलेल्या आकाशचा रात्री उशिरापर्यंत थांगपत्ता लागला नाही. मुलगा बुडाल्याची वार्ता कानी येताच आकाशची आई लता लोंढे यांच्यासह नातेवाइकांनी गोदाकाठी येऊन एकच टाहो फोडला.

टॅग्स :Nashik Floodनाशिक पूरRainपाऊसgodavariगोदावरी