चांदवड - चांदवड तालुक्यात कोरोनाचे रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असून हा चिंतेचा विषय आहे. तर चांदवड तालुक्यात कालपर्यंत ११८१ रुग्ण संख्या आहे.
चांदवड शहरात शांतता समिती व व्यापारी , नगरसेवक यांनी बैठक घेऊन चांदवड शहरात दि. ३ एप्रिल ते ११ एप्रिल पावेतो नऊ दिवस जनता कर्फ्यु पाळण्याचे ठरविले होते.त्यातच राज्य शासनाने दि.५ एप्रिल मध्यरात्रीपासून ब्रेक द.चैन अंतर्गत दि.३० एप्रिल पर्यंत जीवनाश्यक वस्तु ,मेडीकल दुकाने , दवाखाने सोडता सर्वच आस्थापना बंद राहतील जाहीर केल्याने चांदवडकरांच्या माथी नऊ दिवसाचे लॉकडाऊन असतांना दि. ३० एप्रिलपर्यंत बंदची नामुष्की ओढावली आहे.
आज मंगळवारी चौथ्या दिवशी शहरातील सर्वच दुकाने अत्यावश्यक सेवा वगळता बंद होते. रस्त्यावर दिवसभर शुकशुकाट दिसत होता. या बंद मुळे नागरीकांनी घरातच थांबणे पंसत केले.मात्र बाहेर ग्रामीण भागातून येणारे जाणारे लोंढे मात्र दिसत होते. त्यामुळे काही वेळापुरती तरी गर्दी बाजारात दिसत होती. गेल्या चार दिवसापासून भाजीपाला व फळबाजार बंद होता तो मात्र आज मंगळवारी पुर्ववत सुरु झाल्याचे दिसत होते.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संपुर्ण चांदवड शहरात जनता कर्फ्यु लावण्यात आला आहे. रुग्ण संख्या वाढत आहे. त्याबरोबर कोरोनामुळे अनेक जणांना जीव गमावावा लागला आहे . सद्यस्थितीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व कोरोनापासून मुक्तता मिळविण्यासाठी सर्व व्यापारी बांधवाशी चर्चा करुन आगामी नऊ दिवस स्वयंस्फुर्तीने बंद करण्याचे ठरले होेते. त्यातच राज्यशासनाचा मिनी लॉकडाऊन आल्याने पुन्हा बंद ओढवणार आहे.
यात दुधविक्रेते,भाजीविक्रेते, मेडीकल दुकाने, दवाखाने, वृत्तपत्र विक्रेते यांना या बंद मधुन वगळण्यात आले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बाजारात फिरुन पुन्हा कोरोनाचा प्रसाद इतरांना देत असल्याने कडकडीत बंद गरजेचा असल्याचे बोलले जात आहे.शहरात व तालुक्यात बऱ्याच भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठी झाली आहे.