शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जूनमध्ये सर्व मंजूर कामांच्या निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 00:56 IST

महापालिकेच्या सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात मंजूर असलेल्या सर्व कामांच्या निविदा जून महिन्यात काढण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत. यापुढे सर्व प्राकलने जीओ टॅग फोटोसह सादर करण्याचेही बंधन घालण्यात आले आहे.

नाशिक : महापालिकेच्या सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात मंजूर असलेल्या सर्व कामांच्या निविदा जून महिन्यात काढण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत. यापुढे सर्व प्राकलने जीओ टॅग फोटोसह सादर करण्याचेही बंधन घालण्यात आले आहे.  आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेतील सर्व विभागांच्या प्रमुखांची बैठक घेऊन मंजूर कामांवर चर्चा केली. सद्यस्थितीत विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने ज्या कामांना प्रशासकीय मान्यता आहे, त्यांची निविदाप्रक्रिया राबविण्याची तयारी करण्याचे तसेच ज्या कामांची निविदाप्रक्रिया सुरू आहे, ती पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर सर्व मंजूर कामांच्या निविदा काढण्याच्याही सूचना आयुक्तांनी दिल्या.औषधसाठा आॅनलाइन करावैद्यकीय विभागामार्फत मोठ्या प्रमाणावर औषधांची खरेदी केली जाते. सदर औषधांचा साठा हा मॅनेजमेंट सिस्टममध्ये टाकण्यासंदर्भात सूचना यापूर्वी वैद्यकीय विभागाला देऊनही त्याची अंमलबजावणी न झाल्याने आयुक्तांनी वैद्यकीय अधीक्षकाला जाब विचारला. हॉस्पिटलमध्ये असलेला औषधांचा साठा आॅनलाइन करण्याचा आदेशही आयुक्तांनी दिला. वैद्यकीय विभागाच्या कामकाजावर ताशेरे ओढण्यात आले. याशिवाय, प्रशासकीय मान्यता असलेल्या कामांचेही कार्यादेश आचारसंहितेनंतर विनाविलंब काढण्यात यावेत. ज्या कामांना मुदतवाढ आवश्यक आहे, त्यांच्या  दतवाढीसाठी किमान दोन महिने अगोदर प्रस्ताव सादर करण्याचेही बंधन घालण्यात आले आहे. दरम्यान, यापुढे सर्व प्राकलने जीओ टॅग फोटोसह सादर करणे आवश्यक करण्यात आले आहे. शहरात सेंट्रल लायब्ररी सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी मिळकत विभागाने जागा निश्चिती करावी, अशा सूचना देण्यात  आल्या.  यापुढे कोणत्याही विभागास बांधकाम करावयाचे असल्यास त्यांना त्या कामाकरिता संबंधित विभागाच्या अंदाजपत्रकातील लेखाशीर्षतूनच खर्च करणे अपेक्षित असून फक्त इमारत बांधण्याचे काम बांधकाम विभागामार्फतच होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका