शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीतील सर्वच रस्ते जलमय; वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 15:11 IST

अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांना स्वतः वीज पंप लावून तसेच हातात बादली घेऊन साचलेले पाणी घरा बाहेर काढावे लागले दिंडोरी रोड पंचवटी पोलीस ठाणे पेठरोडवरील, मेहरधाम, तळेनगर रस्त्यावर तसेच वाघाडी नजीक असलेल्या घरांमध्ये देखील पावसाचे पाणी साचलेले होते.

ठळक मुद्देपावसाचा जोर कायम : पालिका अधिकार्‍यांचे दुर्लक्षअधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी स्विच ऑफ होते

पंचवटी : परिसरातील सर्व विभागातील ड्रेनेज तुडुंब भरल्याने अनेक नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले तर मुख्य रस्त्यावर दीड ते दोन फुटापर्यंत पुराचे पाणी साचले होते. रविवारी (दि.4) पंचवटीतील पेठरोड, दिंडोरीरोड, तळेनगर परिसरात असलेल्या रस्त्यावर पाणी पाणी झाल्याने संपूर्ण रस्ते जलमय झालेले होते.संपूर्ण रस्त्यावर पाणी पाणी साचल्याने पेठरोड, दिंडोरीरोड रस्त्यावरील एका बाजूची वाहतूक काही काळ बंद झालेली होती. काल शनिवारी (दि.3) रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर रविवारी दुपारपर्यंत कायम असल्याने पंचवटी परिसरातील बहुतांश भाग जलमय झालेला होता ड्रेनेज नाले तुंबल्याने पेठरोड आरटीओ तळेनगर रामवाडी परिसरात राहणारे अनेक नागरिकांच्या घरातून पाणी वाहत होते मनपा प्रशासनाने नालेसफाईचा दावा केला असला तरी हा दावा पूर्णपणे फोल झाल्याचे दिसून आले.अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांना स्वतः वीज पंप लावून तसेच हातात बादली घेऊन साचलेले पाणी घरा बाहेर काढावे लागले दिंडोरी रोड पंचवटी पोलीस ठाणे पेठरोडवरील, मेहरधाम, तळेनगर रस्त्यावर तसेच वाघाडी नजीक असलेल्या घरांमध्ये देखील पावसाचे पाणी साचलेले होते. पावसाचा जोर दुपारपर्यंत कायम असल्याने अनेक नागरिकांच्या घरात पाणी साचल्याने संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले.पालिका अधिकार्‍यांचे दुर्लक्षसलग दोन दिवस सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पंचवटी परिसरात अनेक नागरिकांच्या घरात नाल्याचे पाणी तुंबले होते या प्रकारानंतर अनेक नागरिकांनी महापालिकेच्या संबंधित विभागाकडे संपर्क साधला असता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी स्विच ऑफ होते तर प्रभागातील काही लोकप्रतिनिधींना पाणी तुंबले अशी माहिती दिल्यानंतर सगळीकडे हीच परिस्थिती आहे कोणी कर्मचारी भेटतो का बघतो पाठवतो अशी उत्तरे नागरिकांना दिल्याने नागरिकांनी मनपा अधिकारी व संबंधित प्रभागाच्या लोकप्रतिनिधी विरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Nashikनाशिकgodavariगोदावरीfloodपूर