शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

युवकांच्या पुढाकारातून एरंडगाव येथील सर्व रस्ते बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 17:08 IST

जगभर पसरलेल्या कोरोना आपल्या गावात येऊ नये यासाठी येवला तालुक्यातील एरंडगाव येथील ग्रामस्थांनी खबरदारी घेतली आहे. गावातील एकही व्यक्ती वस्तू खरेदीसाठी बाहेरगावी जाणार नाही व संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही व आपला गाव सुरक्षित रहावा यासाठी गावातील युवक सरसावले आहेत. गावात येण्यासाठी असणारे सर्व मार्ग बंद केले आहेत.

एरंडगाव : जगभर पसरलेल्या कोरोना आपल्या गावात येऊ नये यासाठी येवला तालुक्यातील एरंडगाव येथील ग्रामस्थांनी खबरदारी घेतली आहे. गावातील एकही व्यक्ती वस्तू खरेदीसाठी बाहेरगावी जाणार नाही व संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही व आपला गाव सुरक्षित रहावा यासाठी गावातील युवक सरसावले आहेत. गावात येण्यासाठी असणारे सर्व मार्ग बंद केले आहेत. तसेच गावात आता एकही वाहन प्रवेश करणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.फक्त रस्ते बंद करून हे युवक थांबले नाही तर ज्या भागात मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात आहे त्यांना सर्वोतोपरी मदत करण्याचे कामही या युवकांनी हाती घेतले आहे. येथील युवक एकत्र येऊन विविध उपक्र म राबवत असतात. या लॉकडाउन काळात, संचारबंदी कालावधीत गरीब कुटुंबातील आजारी व्यक्तींना मेडिकल व दवाखान्याचा खर्च पुरविणे. गरीब व गरजू कुटुंबांना किराणा वाटप करणे आदी उपक्र म राबवित आहेत. या उपक्र मात रवींद्र साताळकर, शरद रंधे, सतीश काळे, अनिल पडोळ, बाबासाहेब गोविंद, रशीद पटेल, मुक्तार पटेल, सागर सुराणा, ज्ञानेश्वर पडोळ, तुकाराम पडोळ, अश्फाक सैय्यद, देविदास खकाळे, दत्तू बोराडे, गोरख शिंदे, समाधान आहेर, सागर आहेर, गणेश चौघुले, असिफ पठाण, खलील पठाण, आवेद शेख, जावेद शेख, तन्वीर शेख आदी परिश्रम घेत आहेत. दरम्यान, करोनापासून गाव वाचवण्यासाठी एरंडगाव येथील युवक राबवत असलेले उपक्र म स्तुत्य आहे. गावातील प्रत्येक घरी भाजीपाला, आवश्यक किराणा पोहोच करून गरजूंची चिंता मिटवली आहे. शासनाच्या आदेशाचे पालन करून मास्क वाटप केले आहेत. एखाद्यावर वाईट प्रसंग आल्यास तातडीने मदत केली जाते. हा आदर्श इतर गावातील युवकांनीही घ्यावा, असे सुरेश उशीर यांनी सांगितले. तर एरंडगावातील युवक नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत. मात्र बाहेरच्या लोकांना गावात प्रवेश बंद करणे हे अमानवीय आहे. ज्यावेळी गावात काही सार्वजनिक कार्यक्र म असो अथवा निवडणूक असो अशावेळी गावपुढाऱ्यांना प्रथम गावातील मतदार यादीत असलेले पण नोकरी, व्यवसाय निमित्ताने बाहेरगावी असलेल्यांची आठवण येते. मग संकटकाळी त्या लोकांना गावात यायचे असल्यास त्यांना गावात येण्यास बंदी करायची, हे योग्य नाही अशी भावना बाहेरगावी नोकरीस असलेला एरंडगावकरांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य