शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जुन्या पेन्शनसाठी महाराष्ट्र भर सर्व आमदारांना पेन्शनसाठी साकडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 14:49 IST

लोकमत न्युज नेटवर्क त्र्यंबकेश्वर : शालेय शिक्षण विभागाने दि. १० जुलै २०२० रोजी काढलेली अधि सुचना शिक्षकांच्या न्याय हक्कावर ...

ठळक मुद्देआमदार हिरामण खोसकर यांच्या मार्फत शासनाला निवेदन देण्यात आले

लोकमत न्युज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : शालेय शिक्षण विभागाने दि. १० जुलै २०२० रोजी काढलेली अधि सुचना शिक्षकांच्या न्याय हक्कावर अन्याय करणारी असल्याने ही अधिसुचना तात्काळ रद्द करून १ नोव्हें बर २००५ पूर्वी नियुक्त व नंतर शासनाचे १००टक्के अनुदान मिळालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १९८२ ची पेन्शन योजना लागू करणेबाबत मंगळवारी(दि.२८) नाशिक शहर व नाशिक जिल्हा जुनी पेन्शन कोअर कमिटी त्र्यंबकेश्वर यांच्या वतीने या भागातील आमदार हिरामण खोसकर यांच्या मार्फत शासनाला निवेदन देण्यात आले आहे.शासनाच्या सेवेत १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाºयांना १९८२ ची पेन्शन योजना लागू आहे. व त्यानंतर नियुक्त कर्मचाºयांना नवीन पेन्शन म्हणजे डी.सी. पी.एस.ही योजना लागू आहे. शासनाच्या सर्व विभागातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाºयांना १९८२ चीच पेन्शन योजना लागू आहे. मात्र १ नोव्हेंबर २००५ पूर्वी १००टक्के अनुदान नसल्याचे कारण पुढे करु न शासन या कर्मचाºयांची जुनी पेन्शन हिरावून त्यांना डी.सी.पी.एस. लागू करु पाहत आहे.तथापि १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांनी अनेक वर्षे विना अनुदानावर सेवा केली आहे. त्यांना १००टक्के शासन अनुदान अति विलंबाने १ नोव्हेंबर २००५ नंतर मिळालेले असून त्यांच्याबाबतीत एवढ्या विलंबाने डी.सी.पी.एस.लागू करण्याचा निर्णय घेतल्यास ही बाब शिक्षकांवर अन्याय करणारी आहे.म्हणून महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा कर्मचारी नियमावली १९८१ मध्ये पूर्वलक्षी प्रभावाने बदल करणारी दि.१० जुलै २०२० ची अधिसूचना रद्द करु न १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानित अंशत: अनुदानित शाळा किंवा तुकडीवर नियुक्त व त्यानंतर १००टक्के अनुदान मिळालेल्या कर्मचार्यांच्या योगदानाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून वरील कर्मचाºयांना १९८२ ची जुनीच पेन्शन योजना लागू करण्याची मागणी या निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री वित्तमंत्ती शिक्षणमंत्री तथा अध्यक्ष जुनी पेन्शन संयुक्त समिती अप्पर मुख्य सचिव (शालेय शिक्षण) यांचेकडे केली आहे. हे निवेदन देतांना जुनी पेन्शन कोअर कमिटीचे सदस्य दीपक व्याळीज, अनिल रौंदळ, सुरेश पाटील, संतोष जगताप, पोरजे आदी शिक्षक उपस्थित होते. (फोटो २८ टिबीके)

टॅग्स :GovernmentसरकारTeacherशिक्षक