शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

२००५ पासूनच्या सर्व महापौरांची चौकशी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:49 IST

महापौर कार्यालयात लघुलेखक म्हणून नियुक्ती असतानादेखील कथितरीत्या गैरहजर राहून प्रत्यक्षात वेतन घेतल्याच्या प्रकरणात संबंधित कर्मचारी रवींद्र दिनकर सोनवणे यांस महापालिकेने निलंबित केले आहे

नाशिक : महापौर कार्यालयात लघुलेखक म्हणून नियुक्ती असतानादेखील कथितरीत्या गैरहजर राहून प्रत्यक्षात वेतन घेतल्याच्या प्रकरणात संबंधित कर्मचारी रवींद्र दिनकर सोनवणे यांस महापालिकेने निलंबित केले आहे. तथापि, २००५ पासून आत्तापर्यंतचे सर्व महापौर आणि नगरसचिवांकडून यासंदर्भातील अभिप्राय घेण्याचे आदेश देण्यात आल्याने आता सर्व माजी महापौरांची चौकशी होणार आहे. एखाद्या कर्मचाऱ्याच्या प्रकरणात आजी-माजी महापौरांची चौकशी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.महापालिकेचे सभागृह नेता दिनकर पाटील यांनी केलेल्या तक्रारीवरून रवींद्र सोनवणे या लघुलेखकाची चौकशी करण्यात येणार असून, त्याच्या निलंबन पत्रात म्हटल्यानुसार २००५ पासूनच्या महापौरांचा अभिप्राय घेण्यात येणार आहे त्यामुळे आता भाजपाचे आमदार असलेले बाळासाहेब सानप, शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे तसेच नयना घोलप, महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे माजी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, अशोक मुर्तडक तसेच भाजपाच्या विद्यमान रंजना भानसी या सर्वांचीच चौकशी होणार आहे.महापालिकेच्या नगरसचिव विभागातील लिपिक असलेले रवींद्र सोनवणे हे २००५ पासून महापालिकेत काम न करताना वेतन घेत असून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. सोनवणे यांची २०१३ पासून महापौर कार्यालयात लघुलेखक म्हणून नियुक्ती आहे. परंतु तेथेदेखील ते नसतात अशाप्रकारचे पाटील यांचे म्हणणे असून, त्यासाठी त्यांनी ‘पत्रास्त्र’ चालविले आहे. चौकशी न केल्यास आंदोलनेदेखील करण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नगरसचिव गोपीनाथ आव्हाळे यांना नोटीस बजावली. त्या आधारे चौकशी करण्यात आली आणि आता सोनवणे यांना निलंबित करण्यात आले आहे. अर्थात, यापूर्वी नगरसचिवांनी मात्र सोनवणे यांच्या हजेरीचे मस्टरच सादर केले असून, नगरसचिवांनी तसेच या विभागाने प्रमाणित केल्यानुसार सोनवणे यांचे वेतन झाल्याचे दस्तावेज आव्हाळे यांनी उपलब्ध करून दिले आहेत. तथापि, जानेवारी महिन्यापासून बायोमेट्रीक हजेरी सक्तीची असतानादेखील त्यांनी केली नाही, असा आक्षेप प्रशासनाने घेतला आहे. त्यातही महापौर आणि उपमहापौर यांच्या सूचनेनुसार बाहेरील काम करावे लागत असल्याने बायोमेट्रीक हजेरीतून वगळावे यासंदर्भात उपमहापौर प्रथमेश गिते यांचे पत्रदेखील दिले आहे.आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सोनवणे यांच्या निलंबनाचे आदेश काढले असून, त्याखालीच नगरसचिवांना आदेश दिले आहेत. सोनवणे यांच्या हजेरीबाबत २००५ पासूनचे तत्कालीन नगरसचिव व तत्कालीन महापौर यांचे अभिप्राय तसेच कालावधीनिहाय हजेरी प्रमाणित करणारे तत्कालीन लिपिक यांचे अभिप्राय घेऊन प्रस्तुत प्रकरणी २७ मार्च २०१९ पर्यंत कार्यवाही करण्यात यावी अन्यथा आपल्या विरुद्ध प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे महिनाअखेरीस सेवानिवृत्त होणाऱ्या नगरसचिवांवर टांगती तलवार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाfraudधोकेबाजी