शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

येवला तालुक्यातील सर्वच बंधारे कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 23:55 IST

सायगाव : जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला मात्र पावसाने येवला तालुक्याच्या उत्तर पूर्व भागावर वक्र दृष्टी केल्याने तालुक्याच्या उत्तर पूर्व भागातील सर्वच बंधारे कोरडेठाक पडले असून शेतकर्यांना आता रब्बी हंगामाची चिंता लागली आहे.

तालुक्यातील पूर्व भागातील सायगाव व पांजरवाडी परिसरातील कोळगंगा नदीवरील कोरडाठाक पडलेला बंधारा.

 

सायगाव : जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला मात्र पावसाने येवला तालुक्याच्या उत्तर पूर्व भागावर वक्र दृष्टी केल्याने तालुक्याच्या उत्तर पूर्व भागातील सर्वच बंधारे कोरडेठाक पडले असून शेतकर्यांना आता रब्बी हंगामाची चिंता लागली आहे. सुरवाती पासून पाऊस नसल्याने बंधारे विहारी नद्या कोरडया असल्याने या पिकांना पाणी देण्यासाठी कोणतीच शास्वत व्यवस्था नाही. त्यामुळे पावसाच्या भरवश्यावरच शेती अवलंबून आहे. रब्बी हंगामाची पेरणी धोक्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची देखील तीव्र टंचाई भासण्याची चिन्हे आजच दिसत आहे. त्यामुळे रब्बी हंगामाला पाणी देणार कोठून असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. यामुळे शेतकर्याकडून चिंता व्यक्त केली जात आहे.सायगाव, नगरसुलसह उत्तर पूर्व भागातील 10 ते 15 गावांना कोणत्याही पाटपाण्याचा फायदा मिळाला नाही. पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याची प्रतीक्षा या भागातील तीन पिढ्यांनी केली. परंतु पाणी मिळण्याची चिन्हे दिसत नाही. येवला तालुक्याला वरदान ठरणारा मांजरपाडा प्रकल्प मार्गी लागला तर तालुक्याचा पूर्व भाग पूर्णपणे ओलिता खाली येईल. या प्रकल्पामुळे उत्तर पूर्व भागातील सायगाव, नगरसुल, पांजरवाडी, न्याहरखेडे, रेंडाळे, डोंगरगाव या गावांना पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था होणार आहे.बुधवारी मांजरपाडा 1 या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली. हा आशेचा किरण असला तरी नदी जोड प्रकल्पाअतर्गत नारपार खोर्यातील पाणी गोदावरी खोर्यात वळविले आण िपाण्याची उपलब्धता किमान पाच टीएमसीने वाढली या शिवाय बंद पाईप द्वारे शेतीला पाणी देण्याचे नियोजन झाले.अथवा कालव्याची वहन क्षमता वाढविली तरच डोंगरगाव पर्यत पाणी पोहोचू शकते. असे पाणीतज्ञाचा अभ्यास असल्याने मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी मिळण्याची शक्यता धूसर आहे.