शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सारे जहॉँ से अच्छा.. हिंदोस्ता हमारा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 00:58 IST

नाशिक : जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये तसेच सामाजिक व सेवाभावी संस्थांच्या वतीने ठिकठिकाणी ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांनी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देमानवंदना : शाळा, महाविद्यालयांमध्ये मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये तसेच सामाजिक व सेवाभावी संस्थांच्या वतीने ठिकठिकाणी ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांनी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.येवला येथील समता प्रतिष्ठान संचलित मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालयात प्रतिष्ठानच्या संचालक सुधा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून अमित पटेल, उपनगराध्यक्ष सूरज पटणी, समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे, शरद श्रीश्रीमाळ, सलिल पाटील, शंकर कुमावत उपस्थित होते. बाबासाहेब कोकाटे यांनी प्रास्ताविक केले.सुखदेव आहेर यांनी आभार मानले. कार्यक्र मास हेमंत पाटील, मंदा पडोळ, संतोष कोकाटे, रेखा दुनबळे, नितीन कदम, रावसाहेब खराटे, रावसाहेब सोनवणे, विजय जाधव, मारूती पगारे, देवीदास पगारे, शोभा कदम आदी उपस्थित होते.अभोण्यात स्वातंत्र्यदिन साजराअभोणा : येथील ग्रामपालिकेसह विविध संस्थांमध्ये मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत शारीरिक अंतराचे पालन करत ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपालिकेत प्रशासक इंजि. कांतीलाल चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी जिभाऊ जाधव, ताराबाई पवार, सोमनाथ सोनवणे, गणपत दुसाने,चंद्रकांत पगारे, मदन करवंदे, विजय देसाई, सुधीर बिरार,विक्रम जाधव, संजय पाटील, नीलेश मुसळे, हिराबाई आहेरराव, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. डांग सेवा मंडळाच्या जनता विद्यालयात संस्थेचे उपाध्यक्ष शंकरराव मराठे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नंदकिशोर बधान, हरि सानजे, उमाकांत गायकवाड उपस्थित होते.आरबीएच कन्या विद्यालय, मालेगाव कॅम्प मालेगाव : येथील आरबीएच कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यायात प्राचार्य अलका जोंधळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानिमित्त विविध आॅनलाइन स्पर्धा घेण्यात आल्या. प्राचार्य जोंधळे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थिनी मोबाईल हाताळत असताना पालकांनी दक्ष राहावे, असे सांगून पालकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनigatpuri-acइगतपुरी