शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘अलर्ट सायरन’वरून वाहनचालक-पोलिसांमध्ये ‘खटके’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:33 IST

शहरातील विविध सिग्नलवर बसविण्यात आलेले ‘अलर्ट सायरन’ हे खरे तर वाहनचालकांना इशारा देण्यासाठी आहेत. सायरन वाजताच पादचाºयांना मार्गस्थ होण्यासाठी प्राधान्य द्यावे, वाहने पुढे नेऊ नये, असा सूचक इशरा सायरनमार्फत मिळतो; मात्र सिग्नलवर नेमके याविरुद्ध चित्र बघावयास मिळत असल्याने वाहतूक पोलिसांसोबत वाहनचालकांचे खटके उडत आहेत.

नाशिक : शहरातील विविध सिग्नलवर बसविण्यात आलेले ‘अलर्ट सायरन’ हे खरे तर वाहनचालकांना इशारा देण्यासाठी आहेत. सायरन वाजताच पादचाºयांना मार्गस्थ होण्यासाठी प्राधान्य द्यावे, वाहने पुढे नेऊ नये, असा सूचक इशरा सायरनमार्फत मिळतो; मात्र सिग्नलवर नेमके याविरुद्ध चित्र बघावयास मिळत असल्याने वाहतूक पोलिसांसोबत वाहनचालकांचे खटके उडत आहेत.  शहरातील बहुतांश सिग्नलवर ‘अलर्ट सायरन’ बसविले गेले आहेत. सिग्नलचा दिवा लाल झाल्यानंतर अखेरचे काही सेकं द शिल्लक राहताच सायरन वाजतो. या सायरनचा अर्थ म्हणजे पादचारी सिग्नल ओलांडत आहेत, वाहनचालकांनी वाहने सुरू करू नये, असे आहे; मात्र बहुसंख्य वाहनचालकांकडून याबाबत गैरसमज करून घेतला जात असल्याचे चित्र शहरातील सिग्नलवर पाहावयास मिळत आहे. सायरन वाजला म्हणजे सिग्नल सुटला असा अर्थ घेऊन काही दुचाकी-चारचाकी वाहनचालक वाहने पुढे दामटवितात. यावेळी अपघाताचा धोकाही ओढावतो. याबाबत वाहतूक शाखेकडून जनजागृती होणे गरजेचे आहे. सायरनचा आवाज ऐकून लाल दिव्याकडे दुर्लक्ष करत वाहने पुढे नेणाºया वाहनचालकांना संबंधित वाहतूक पोलिसांनी अडविले असता त्यांच्यामध्ये खटके उडून वादविवादाचे प्रकार घडतात. ‘सायरन वाजला तेव्हा आम्ही वाहन पुढे आणले, आम्ही कुठे सिग्नलचा नियम भंग केला’ असे सांगून वाहतूक पोलिसांसोबत वाद घालतात. एकूणच वाहतूक नियमांबाबत असलेली उदासीनता व निरक्षरतेच्या माध्यमातून होणाºया गैरसमजापोटी सदर समस्या उद्भवत आहे. सायरनचा अर्थ समजून घेत वाहनचालकांनी अखेरचे काही सेकंद सिग्नलवर थांबून राहावे आणि सिग्नल ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या पादचाºयांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. वाहन सुरू करून पुढे जाण्याचा इशारा सायरन देत नाही, तर तो वाहन थांबविण्याचा आणि आता पादचारी मार्गस्थ होऊ शकतात, असा इशारा देतो. सिग्नलचा सूक्ष्म अभ्यास करावा चौकांमधील सिग्नलचा अभ्यास नागरिकांनी करणे गरजेचे आहे. सिग्नलवरील सायरन जेव्हा वाजतो तेव्हा सिग्नलचा दिवा हा लालच असतो, तर ज्या बाजूचा सायरन वाजला आहे त्या बाजूला सिग्नल व पादचाºयाचे सांकेतिक चित्र हिरवे होते. याचाच अर्थ पादचाºयांनी रस्ता ओलांडावा जोपर्यंत सायरन वाजत आहे तोपर्यंतच. म्हणजेच वाहनचालकांनी सावध व्हावे, वाहने पुढे आणू नये, पादचाºयांना प्राधान्य द्यावे, असा याचा सरळ अर्थ होतो.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडी