शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपी पतीचा जाच, पत्नीने काढला काटा; मायलेकाला अटक

By धनंजय वाखारे | Updated: October 6, 2023 19:59 IST

न्यायडोंगरीतील घटना

किशोर मोरे, न्यायडोंगरी (नाशिक): दारू पिऊन मारहाण करत असल्याच्या रागातून पत्नीनेच आपल्या अल्पवयीन मुलाच्या साहाय्याने पतीचा गळा आवळून खून करत काटा काढल्याची घटना येथील वृंदावन नगरात गुरूवारी (दि.५) रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायडोंगरी येथील वृंदावन नगर, त्रिमूर्ती पेट्रोलपंपासमोर राहणाऱ्या मीराबाई ममराज राठोड यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, उषा संजय गायकवाड व त्यांचा अल्पवयीन मुलगा या पती संजय गणेश गायकवाड (३३) याच्यासोबत वृंदावननगर येथे वास्तव्याला आहेत. ऊसतोड कामगार असलेल्या संजय गायकवाड हा रात्रीच्या सुमारास दारू पिवून मारहाण करत असल्याचा राग येऊन उषा गायकवाड हिने पती संजयच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली तर तिच्या अल्पवयीन मुलाने नायलॉन दोरीच्या सहाय्याने संजय याचा गळा दाबल्याने त्याचा मृत्यू झाला.

याबाबतची फिर्याद मयत संजय याची आई मीराबाई ममराज राठोड यांनी नांदगाव पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार मायलेकाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख , नांदगावचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे हे करीत आहेत.

मुलगा बालसुधारगृहात

 नांदगाव पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवीत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यात मुलगा अल्पवयीन असल्याने त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी