शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

देवळा तालुक्यातील वाजगाव ग्रामसभेत मद्यपींचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 17:36 IST

ग्रामस्थ त्रस्त : यापुढे मद्यपींना ग्रामसभेत मनाई करण्याचा ठराव

ठळक मुद्देवाजगाव येथे आठवडयातून दोन दिवस तलाठी देण्यात यावा अशी मागणीग्रामसभेस महिला व पुरूषांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मंदिराचा सभामंडप व प्रांगण गर्दीने भरून गेले होते

देवळा : तालुक्यातील वाजगाव येथे झालेल्या ग्रामसभेत मद्यपींनी केलेल्या गोंधळामुळे सभेच्या कामकाजात वारंवार अडथळा निर्माण झाल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले. अखेर यापुढे ग्रामसभेत मद्यपींना प्रवेश देऊ नये, असा ठराव सर्वानुमते करण्यात आला.येथील मारूती मंदिरात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रकाश मोहन होते. ग्रामसभेस महिला व पुरूषांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मंदिराचा सभामंडप व प्रांगण गर्दीने भरून गेले होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. घरकुल योजनेबाबत लाभार्थींनी तक्ररी केल्या, त्यात दोन तीन मद्यपी गोंधळ घालून सभेत वारंवार अडथळा आणत होते. यामुळे सर्व जण त्रस्त झाले. हया मद्यपींचा बंदोबस्त करण्याची मागणी सुनील देवरे यांनी केली. वाजगाव येथे तलाठी सजा नसल्यामुळे शेतकऱ्यांना मटाणा येथे तलाठी कार्यालयात कामकाजासाठी जावे लागते, यामुळे गैरसोय होते. वाजगाव येथे आठवडयातून दोन दिवस तलाठी देण्यात यावा अशी मागणी संदीप देवरे यांनी केली. वडाळा कनकापूर रस्त्यावर अडथळा करणारी काटेरी झुडपे काढण्यात यावी व वडाळे येथे व्यायामशाळा बांधावी अशी मागणी वाल्मिक केदारे यांनी केली. भारत निर्माण योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीतून गावाचा पाणीपुरवठा सुरू करून योजना कार्यान्वित करावी, तसेच ग्रामपंचायतीची विकासकामे गावातील स्वयंरोजगार बेरोजगार संस्थाना देण्यात यावी अशी मागणी देवरे यांनी केली असता यावर चर्चा होउन प्रायोगिक तत्वावर कामाची मागणी करणा-या संस्थांना कामे देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. कोलतेवाडी ते वाजगाव रस्त्याची मागणी दिपक देवरे यांनी केली. गावातील काही ग्रामस्थ आपल्या शौचालयांचे सांडपाणी कोलती नदीपात्रात सोडून देतात, यामुळे प्रदूषण व अस्वच्छता निर्माण होते, यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता करण्याची मागणी प्रमोद पवार यांनी केली.आदिवासी वस्तीत नवीन मोटार टाकण्यात यावी, स्मशानभूमी, आदिवासी वस्तीला तारेचे कुंपन व साफसफाई करण्यात यावी,वाजगाव मटाणे रस्त्यावरील काटेरी झुडपे काढणे मागण्या ग्रामस्थांनी केल्या. ग्रामसेवक जे.व्ही. देवरे यांनी आभार मानले.यावेळी उपसरपंच बापू देवरे, ग्रामपंचायत सदस्या , निवृत्ति माळी, ज्ञानेश्वर मोहन, सुनिल देवरे, राजेंद्र केदारे, विलास सोनवणे, बबन नेहे, अमोल देवरे, आत्माराम देवरे, अतुल देवरे, बाळू बैरागी, हिरामण देवरे, गोकुळ कांबळे, हेमंत देवरे, मुंजाराम पवार आदींसह आंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्य सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत