शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाची किमया, गावासह शाळेचा कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 14:49 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यात अनेक अतिदुर्गम आदिवासी गावे आहेत. वर्षानुवर्ष शिक्षणाशी नाळ जुळत नसल्याने सर्व क्षेत्रात मागास राहण्याचे प्रमाण ...

घोटी : इगतपुरी तालुक्यात अनेक अतिदुर्गम आदिवासी गावे आहेत. वर्षानुवर्ष शिक्षणाशी नाळ जुळत नसल्याने सर्व क्षेत्रात मागास राहण्याचे प्रमाण एकीकडे वाढतच आहे. अशा स्थितीत धामडकी या आदिवासी गावाचा दर्जेदार शिक्षणासह गावाचा कायापालट झाला. विविध कामांद्वारे गावाला झपाट्याने बदलून टाकणारे प्राथमिक शिक्षक प्रमोद परदेशी हे गावासाठी देवदूत ठरले आहेत.धामडकी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून काम करतांना त्यांनी विविध संस्थांच्या मदतीने तालुक्यातील १२ शाळांना डिजिटल आणि भौतिक सुविधा मिळवून दिल्या. तीन गावांना रोटरी क्लब बॉम्बेच्या सहाय्याने मोफत शौचालये बांधून हगणदारीमुक्त केले. मुंबईच्या पेहेचान प्रगती फाउंडेशनच्या अध्यक्ष प्रगती अजमेरा, अमेरिकावासी अभिनव अजमेरा हे परदेशी यांच्या समन्वयाने भौतिक व शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी गावाला भरीव मदत करत आहेत. विद्यार्थ्यांना वर्षभराचे सर्व शैक्षणकि साहित्य, वह्या, पेन, पेन्सील, दप्तर यासह शाळेला लागणाऱ्या सर्व सुविधा पुरविण्यात येतात. डिजिटल शाळेसाठी प्रोजेक्टर, कॉम्पुटर, स्क्र ीन देवून विद्यार्थ्यांना डिजिटल साधनांच्या तंत्रज्ञानाची ओळख करून दिली. आदिवासी महिला पाण्यासाठी वणवण भटकंती करीत असल्याने शाळेला व गावाला पाण्याचे जलकुंभ बांधले.अ‍ॅडव्हेंचर एज्युकेशनल टूर सोबत असलेल्या संपर्कामुळे परदेशी मुंबईच्या नामांकित इंटरनॅशनल शाळेतील विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा धामडकी शाळेत घेतला. यात शाळेची रंगरंगोटी, स्वच्छतागृह दुरु स्ती, खिडक्या बदलून शाळेचे रु पडे बदलवले. शाळेसह गावात सौर दिवे बसवून गाव प्रकाशित केले. ऊर्जा ग्रुपकडून शाळेला इन्व्हर्टर दिल्यामुळे शाळेत २४ तास वीज आहे. गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी तीन शिलाई मशीन मोफत दिल्या. टच वूड फाऊंडेशनचे कपिल सुराणा, बालरोगतज्ञ डॉ. संगीता लोढा यांच्यामार्फत धामडकी शाळेत सहा महिन्यात विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांची मोफत आरोग्य, रक्त तपासणी करून विद्यार्थ्यांना मोफत औषधे दिली जातात.

टॅग्स :Nashikनाशिक