शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘बम बम भोले’चा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 01:18 IST

नाशिक : हर हर महादेव... जय भोले... बम बम भोलेचा गजर करत शेकडो भाविकांनी शहरातील भगवान शंकर अर्थात महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. विविध धार्मिक कार्यक्रमांनी पारंपरिक पद्धतीने महाशिवरात्री सर्वत्र साजरी झाली. शिवरात्र दरमहा येते; मात्र माघ कृष्ण चतुर्दशीला साजरी होणारी शिवरात्र धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्वाची मानली जाते. या रात्रीला महाशिवरात्र ...

ठळक मुद्देमहाशिवरात्री : भगवान शंकराच्या दर्शनासाठी गर्दीपारंपरिक पद्धतीने महाशिवरात्री सर्वत्र साजरी

नाशिक : हर हर महादेव... जय भोले... बम बम भोलेचा गजर करत शेकडो भाविकांनी शहरातील भगवान शंकर अर्थात महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. विविध धार्मिक कार्यक्रमांनी पारंपरिक पद्धतीने महाशिवरात्री सर्वत्र साजरी झाली. शिवरात्र दरमहा येते; मात्र माघ कृष्ण चतुर्दशीला साजरी होणारी शिवरात्र धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्वाची मानली जाते. या रात्रीला महाशिवरात्र नावाने संबोधले जाते. सार्वजनिक सुटी असलेल्या या दिवसाचे हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. देवांचे देव महादेव यांचा हा दिवस कुटुंबातील सर्वच जण उपवास करतात. भगवान शंकराचे स्मरण करीत महादेव मंदिरामध्ये जाऊन शिवपिंडीवर बेलपुष्प अर्पण करून दुधाचा अभिषेक भाविकांकडून केला गेला.भगवान शिवशंकराची आराधना करीत महाशिवरात्रीच्या व्रताची दुसºया दिवशी बुधवारी (दि.१३) सांगता शिवभक्तांकडून केली जाणार आहे. उत्तर भारतात महाशिवरात्र फाल्गून महिन्यात साजरी होते. पृथ्वीच्या निर्मितीप्रसंगी भगवान शंकरांनी याच तिथीला मध्यरात्री रौद्ररूप धारण केले होते, अशी मान्यता आहे. सोमेश्वरला ‘ताल नम: शिवाय’सोमेश्वर मंदिरात महाशिवरात्रनिमित्त सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती. मंदिरात विश्वस्त मंडळाकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी १०८ बाल तबलावादकांनी सामूहिकरीत्या तबलावादन करत ‘ताल नम:शिवाय’ सादर केला. सुमारे तासभर चाललेल्या या तबलावादनाने सोमेश्वर मंदिर परिसर गुंजला होता.