शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

अलाई यांचे समको बँक संचालक पद रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 19:19 IST

सटाणा : येथील मर्चंट बँकचे संचालक राजेंद्र अलई यांचे संचालक पद रद्द करण्याचा निर्णय जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी दिल्याने सहकार वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देजिल्हा उपनिबंधकांचा निर्णय : बँकेच्या नियमांचा भंग

सटाणा : येथील मर्चंट बँकचे संचालक राजेंद्र अलई यांचे संचालक पद रद्द करण्याचा निर्णय जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी दिल्याने सहकार वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.सटाणा मर्चंट को. आँप. बँकेचे माजी अध्यक्ष व संचालक राजेंद्र बाळकृष्ण अलई यांनी गेल्या वर्षभरात दि.९ जुन २०२० पासुन आज पावेतो बँकेच्या कुठल्याही कामकाजात किंवा सभासदांच्या अडीअडचणीकडे लक्ष न देता अध्यक्षपद सोडल्यानंतर बँकेकडे पुर्णपणे पाठ फिरवली असुन बँकेच्या आदर्श मंजूर पोटनियम क्र ४५ (१२) चा देखील भंग केल्याची तक्रार बँकेचे सभासद विजय भांगडिया यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे दि. १२जानेवारी २०२१ रोजी केली होती.या तक्रारीवरुन जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सुनावणीचे कामकाज वेळोवेळी झालेले असुन, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ कअ (अ१) (१) (चार) व अधिनियम १९६१ चे नियम ५८ मधील तरतुदीनुसार संचालकपदावर राहण्यास अपात्रता येत असल्याने राजेंद्र बाळकृष्ण अलई यांना संचालक पदावरून कमी करण्याचा निर्णय जिल्हा उपनिबंधक सतिष खरे यांनी घेतला आहेया तक्रारीच्या सुनावणी कामी बँकेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी देवीदास बागडे तक्रारदार यांच्यातर्फे विजय भांगडिया व राजेंद्र अलई यांचे तर्फे ॲड. शिरिष बागडे यांनी कामकाज पाहिले. मात्र सुनावणी दरम्यान ऐनवेळी ॲड. बागडे यांनी अलई यांचे कामकाज करणे शक्य नसल्याचे म्हटले असुन त्यांचे सदर तक्रारीबाबत काहीही एक म्हणणे नसल्याचे सांगितल्याने जिल्हा उपनिबंधक यांनी त्यांच्या निलंबनाचा आदेश निर्गमित केला.या आदेशामुळे बँकेचे संचालक मंडळ १७ पैकी ६ ने कमी होवून ११ वर आलेले असुन अजून काही संचालकांवर वेगवेगळ्या आरोपातून लवकर अपात्रता येण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा बँक वर्तुळात चर्चा आहे. (२३ सटाणा बँक)

टॅग्स :bankबँकGovernmentसरकार