शहरं
Join us  
Trending Stories
1
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
2
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
4
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
5
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
6
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”; मंत्री चंद्रकांत पाटील
7
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
8
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
9
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
10
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
11
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
12
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
13
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
14
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
15
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
16
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
17
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
18
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
19
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
20
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

वायुदलाचा ‘जय हो’ ; भारतमातेच्या सुपुत्रांचा जयजयकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 01:13 IST

पुलवामा घटनेचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाने भल्या पहाटे पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळ उद््ध्वस्त केले आणि देशाबरोबरच शहरातही अक्षरश: दिवाळी साजरी झाली.

नाशिक : पुलवामा घटनेचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाने भल्या पहाटे पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळ उद््ध्वस्त केले आणि देशाबरोबरच शहरातही अक्षरश: दिवाळी साजरी झाली. शहरातील विविध संस्था आणि संघटनांच्या वतीने जल्लोष करतानाच भारतमातेच्या सुपुत्रांचा जयजयकार करताना सर्वांचा ऊर अभिमानाने भरून आला.पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात ४४ जवानांना हौतात्म्य पत्कारावे लागले. त्यामुळे देशभरात दहशतवाद्यांच्या विरोधात संतापाची लाट होती, त्याचबरोबर दहशतवाद पुरस्कृत करणाऱ्या पाकिस्तानला काही तरी धडा शिकवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यानुरूप पहाटेच्या सुमारास भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळ उद््ध्वस्त केले. सकाळी ही शुभवार्ता कळाली आणि देशवासीयांचा ऊर अभिमानाने भरून आला. आपल्या व्यक्तीगत जीवनातील सुखकारक घटनेइतक्याच आत्मतियतेने सर्वांनी या घटनेचे शेअरिंग केले.सकाळी भल्या पहाटे झालेल्या एअर स्ट्राइकमुळे जल्लोषाचे वातावरण सुरू झाले. घरात घुसून मारले या कृतीचा आनंद सर्वत्र चर्चांमध्ये दिसत होता. भोसला सैनिकी शाळेत जल्लोष झाल्यानंतर अनेक ठिकाणी जल्लोष झाले.भारतीय ध्वज मोटारसायकलवर फिरूनही तरुणाई आनंद व्यक्त करीत होते, तर गंगापूररोडवरील प्रसाद सर्कल येथेदेखील अनेकांनी शहीद स्मारकावर येऊन भारतीय सैन्याने घेतलेल्या बदल्याचा आनंद व्यक्त केला. तसेच तिरंगा हातात धरून सेल्फी काढले.औदुंबर कट्टा आणि सप्तरंग मित्र मंडळाच्या वतीने याठिकाणी जल्लोष करण्यात आला. नाशिकरोड, पंचवटी भागातही येथील जल्लोष करण्यात आला. तसेच राजकीय पक्षांच्या वतीनेदेखील शालिमार आणि अन्य चौकात जल्लोष करण्यात आला.भारतमातेच्या विजयाने दुमदुले शहरफटाक्यांची आतषबाजी, पाकिस्तानची खोड मोडल्याच्या संदेशासह सोशल मीडियावर भारतीय सैन्याच्या अभिमानाचे संदेश फिरत होते. संपूर्ण शहरात, घराघरात आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये केवळ भारतीय हवाई दलाचा एअर स्ट्राइक हाच विषय चर्चेला होता.कॉलेजरोडवर अनेक तरूणांनी दुचाकीवर तिरंगा घेत भारतीय विजयाचा आनंदोत्सव साजरा केला़ भारतमाता की जय असा जयघोष करत कॉलेजरोड, गंगापूररोड, शरणपूररोड येथून बाइक रॅली काढली़भारताने सर्जिकल स्टाइक केल्यानंतर शासकीय तसेच खासगी कार्यालयांमध्येदेखील आनंदोत्सव साजरा करण्यात आल्याचे चित्र  दिसत होते़

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलPakistanपाकिस्तान