शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

‘स्मार्ट नाशिक’साठी हवा लोकसहभाग , गिरीश महाजन : स्मार्ट सिटी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:38 IST

नाशिक : नाशिक शहरात विकासाची मोठी क्षमता आहे. परंतु, स्मार्ट नाशिकसाठी लोकसहभाग आवश्यक असून, पक्षभेद विसरून सर्वांनी त्यासाठी प्रयत्नपूर्वक परिश्रम घ्यावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ‘स्मार्ट सिटी’ परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केले.

ठळक मुद्दे ‘स्मार्ट नाशिक’साठी हवा लोकसहभाग स्मार्ट सिटी परिषदेच्या उद्घाटन

नाशिक : नाशिक शहरात विकासाची मोठी क्षमता आहे. परंतु, स्मार्ट नाशिकसाठी लोकसहभाग आवश्यक असून, पक्षभेद विसरून सर्वांनी त्यासाठी प्रयत्नपूर्वक परिश्रम घ्यावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ‘स्मार्ट सिटी’ परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केले.नाशिक महापालिका आणि नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने हॉटेल ‘द ताज गेटवे’ याठिकाणी एकदिवसीय स्मार्ट सिटी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेचे उद्घाटक गिरीश महाजन यांनी सांगितले, देशभरातील ९८ शहरांच्या यादीत नाशिकची निवड झालेली आहे. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक या साºया दृष्टीने नाशिक परिपूर्ण शहर आहे. शहरात विकासासाठी मोठ्या संधी आहेत. केवळ टापटीप कपडे घातले म्हणजे माणूस स्मार्ट होत नाही, तर त्याचे बौद्धिक, शारीरिक स्वास्थ्यही तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच शहराचेही आहे. उड्डाणपूल, चांगले रस्ते बांधले म्हणजे शहर स्मार्ट होत नाही. शहराला मूलभूत गरजांची व्यवस्थाही महत्त्वाची आहे. शहरात आरोग्यविषयक अनेक तक्रारी आहेत. राज्यात डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण नाशिकमध्ये सापडले आहेत. अशा स्थितीत आरोग्यविषयक उपयुक्त प्रकल्प उभे करावे लागणार आहेत. स्मार्ट नाशिक अंतर्गत अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर सध्या काम सुरू आहे. बदलण्याची मानसिकता प्रत्येकाने ठेवली पाहिजे. स्मार्ट सिटी अंतर्गत कौशल्य विकासाची केंद्रे उभारली जाणार आहेत. त्यामुळे उद्योगांना पूरक मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकणार आहे.शहरात उद्योग वाढीस लागले पाहिजेत. पीपीपी तत्त्वावर सार्वजनिक स्वच्छतागृहांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. प्रकल्प राबविताना अडचणी येतील; परंतु लोकसहभागाशिवाय शहर स्मार्ट होणे अशक्य असल्याचेही महाजन यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी, महापौर रंजना भानसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटीची मांडलेली संकल्पना तडीस नेण्यासाठी सर्वांचा पुढाकार असणे आवश्यक असल्याचे सांगत, कुंभनगरीत विकासाच्या योजना राबविण्याबरोबरच गावठाणाचाही विकास होणार असल्याचे स्पष्ट केले. ई-स्मार्ट एनर्जी सोल्युशन प्रा. लिमिटेडचे जनरल मॅनेजर जोसेफ माप्राईल, नार्वेच्या कौन्सिल जनरल अ‍ॅन ओल्लेस्टड स्मार्ट सिटी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन. व्यासपीठावर वसंत गिते, दिनकर पाटील, बाळासाहेब सानप, अभिषेक कृष्ण, रंजना भानसी, महेश झगडे, अ‍ॅना ओल्लेस्टड, सीमा हिरे आणि जोसेफ माप्राईल.चर्चासत्रांचे आयोजनस्मार्ट नाशिक परिषदेत विविध कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच तज्ज्ञ, अधिकारी यांनी आपल्या संकल्पनांचे तसेच अनुभवांचे सादरीकरण केले. त्यात प्रामुख्याने आयटीडीपीचे हर्षद अभ्यंकर, कार्तिक हरिहरन, नाशिक स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने विविध योजनांविषयक सादरीकरण केले.‘प्रकल्प गोदा’कडे विशेष लक्षपालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले, स्मार्ट सिटी अंतर्गत गोदा प्रकल्प राबविला जाणार असून, त्याकडे सरकार विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. गोदावरी नदी ही शहराची जीवनदायिनी आहे. गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. प्रकल्प गोदाद्वारे शहराच्या पर्यटनाला तसेच अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. गोदावरी पात्रातील कॉँक्रिटीकरण काढावे की नाही याबाबत अभ्यासांतीच निर्णय घेण्यात येणार असल्याचेही महाजन यांनी स्पष्ट केले.