शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आयमा अध्यक्षपदासाठी चुरशीची लढत; आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:25 IST

उद्योजकांचे नेतृत्व करणाऱ्या अंबड इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा)च्या निवडणुकीत २६ पैकी २५ जागा या बिनविरोध झाल्या असून, अध्यक्षपदाच्या एका जागेसाठी मंगळवारी सकाळी ७ ते सायंकाळी ५ यावेळेत मतदान होणार आहे.

सिडको : उद्योजकांचे नेतृत्व करणाऱ्या अंबड इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा)च्या निवडणुकीत २६ पैकी २५ जागा या बिनविरोध झाल्या असून, अध्यक्षपदाच्या एका जागेसाठी मंगळवारी सकाळी ७ ते सायंकाळी ५ यावेळेत मतदान होणार आहे. निवडणुकीत दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले असून, सत्ताधारी एकता पॅनलचे उमेदवार वरुण तलवार व विरोधी एकता पॅनलेचे उमेदवार तुषार चव्हाण यापैकी कोणाच्या गळात अध्यक्षपदाची माळ पडणार याचे भवितव्य सुमारे १५०० सभासद ठरविणार आहेत. आयमा निवडणुकीत २६ पैकी २५ जागा बिनविरोध झाल्या असून, अध्यक्षपदाच्या एका पदासाठी होत असलेल्या निवडणुकीत मंगळवारी आयमा हाउस येथे सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळात मतदान होणार आहे. यासाठीची संपूर्ण तयारी पूर्ण झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाºयांनी सांगितले. आयमा या संस्थेच्या माजी अध्यक्षांनी मागील निवडणुकीप्रमाणे यंदाची निवडणूकदेखील बिनविरोध व्हावी यासाठी दोन्ही पॅनलच्या गटांची बैठक घेत समझोता करण्याचा प्रयत्न केला, परंतु यास यश न आल्याने अखेरीस निवडणूक घेण्यात आली. दोन्ही गटांकडून प्रचारास अखेरच्या दिवसापर्यंत भर उन्हात मतदारांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी धावपळ केल्याचे चित्र बघावयास मिळाले असल्याने यंदाची निवडणूक अत्यंत अटीतटीची व चुरशीची बघावयास मिळली. दोन्ही पॅनलमधील उमेदवार व सभासदांचे दोन्ही गटांशी मैत्रिपूर्ण संबंध असले तरी सदरची निवडणूक ही केवळ मागील निवडणुकीत दिलेला शब्द पाळला नसल्याने होत असल्याचे बोलले जात आहे. सत्ताधारी एकता पॅनलकडून अध्यक्षपदासाठी वरुण तलवार यांना संधी दिली आहे, तर विरोधी गटाच्या एकता पॅनलकडून तुषार चव्हाण हे आपले नशीब आजमावत आहे.  मंगळवारी (दि.२९ ) मतदान होणार असून, तुषार चव्हाण व वरुण तलवार यांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार असून, बुधवारी (दि.३०) मतमोजणी होऊन या निवडणुकीत विजयी झालेले नूतन अध्यक्ष हे ३१ मे रोजी आयमाच्या सर्वसाधारण वार्षिक बैठकीत पदभार स्वीकारणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :Electionनिवडणूक