शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अहिंसा परमो धर्म:

By admin | Updated: April 19, 2016 22:39 IST

अहिंसा परमो धर्म:

 नांदगाव : श्री महावीर भगवान यांच्या २६१५व्या जयंतीनिमित्त नांदगाव येथे आर्यिका श्री १०५ सौहार्दमती माताजी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ६ वाजता प्रभातफेरी काढण्यात येऊन ज.ता.का. जैन धर्मशाळेत झेंडावंदन करण्यात आले. फेरीत ओसवाल, श्वेतांबर व दिगंबर जैन समाज सहभागी झाले होते. त्यानंतर भगवान महावीरांच्या मूर्तीला पंचामृत अभिषेक करण्यात आला. १० वाजेपासून आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नाटिका व नृत्य सादर करण्यात आले.दुपारी २ वाजता शहरातून दुचाकीद्वारे फेरी काढण्यात आली. साडेतीन वाजता महावीरांच्या मूर्ती असलेल्या भव्य पालखीची शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी वंदे वीरम् व महावीर भगवान की जय अशा घोषणा देण्यात आल्या.आर्यिका श्री १०५ सौहार्दमती माताजींचे प्रवचन झाले. त्यांनी भगवान महावीरांनी उपदेश केलेल्या मार्गावरून चालण्याचे आवाहन केले. तसेच विश्व हे एक कुटुंब असून, आयुष्याच्या बागेत, करुणारूपी जलाचे सिंंचन करा. शुभचिंत्ांन करा. दु:खी व पीडित मनांना आधार द्या. दुसऱ्यांचे दु:ख निवारण करेल तोच खरा महावीर. जीवनाचे सार हेच आहे, असे सांगितले. मिरवणुकीत पुरुषांनी सफेद रंगाचे कपडे घातले होते, तर महिलांनी लाल रंगाचे ठिपके असलेल्या साड्या परिधान केल्या होत्या. दुहेरी रांग करून शिस्तबद्ध संचलनात लहान मुलेही सहभागी झाली होती. घरांवर रंगीत झेंडे लावण्यात आले होते.अर्पण रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात ५५ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. सायंकाळी भ. महावीरांची मूर्ती चांदीच्या पाळण्यात ठेवण्यात आली. रिवाजाप्रमाणे आयोजित कार्यक्रमात नाव ठेवणे, काजळ घालणे, पाळणा हलविणे, अशा विविध क्रियांसाठी बोली लावून त्या सेवा संबंधिताना मिळाल्या. खं. दिगंबर जैन पंचायतीचे अध्यक्ष सुशील कासलीवाल, महामंत्री दिलीप सेठी, फुलचंद लोहाडे, कंचनबाई सेठी, मोतीलालजी कासलीवाल, दिलीप कासलीवाल आदिंनी मार्गदर्शन केले.कैलास कासलीवाल, सुनील पांडे, भरत कासलीवाल, शरद लोहाडे, पीयूष काला, दीपक बडजाते, महावीर पांडे, नूतन कासलीवाल, आनंद काला यांचा आयोजनासाठी सहभाग होता.या दिवशी जैन समाजातील मंडळी व्यवहार बंद ठेवून संपूर्ण दिवस जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत असतात. सटाणा : शहरात भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती आणि अरिहंत ग्रुपतर्फे महावीर जन्मकल्याणक महोत्सव भव्य मिरवणुकीने अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी उपप्रवर्तक प.पू. आशिषमुनीजी यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्र मास महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीचे एवं अरिहंत ग्रुपचे अध्यक्ष सचिन बंब, अमित अजमेरा, विनोद पारख, शैलेश कोठारी, डॉ. महावीर पारख, दिनेश शाह व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. मिरवणुकीत संघपती शांतीलालजी राका, अध्यक्ष डॉ. लखीचंदजी ओस्तवाल, मंत्री दिलीपजी टाटिया, उपाध्यक्ष सुभाषचंदजी बंब, शांतीलालजी पारख, नेमीचंदजी बडजाते, डॉ. दिग्विजयजी शाह, रमणलालजी छाजेड, जितेंद्र पहाडे, मनोज कोठारी, कमलेश छाजेड, विनोद अजमेरा, रितेश ठोळे, केतन खिंवसरा, मनोज सोनग्रा, राहुल लोढा, भूषण पारख, महावीर कांकरिया, सागर ठोळे, भूषण लुंकड, प्रवीण भंडारी, आनंद ओस्तवाल, यश छाजेड, चेतन पारख, गौतम मुथा, राकेश राका, डॉ. अभिजित ओस्तवाल, दिनेश कांकरिया, प्रणीत बिनायक्या, निखिल कालवाडीया, प्रतीक छाजेड, निखिल पारख, गौतम पारख आदि सहभागी झाले होते. (लोकमत ब्युरो)