शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अहिल्यादेवी होळकर यांना विविध संघटनांच्या वतीने अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:09 IST

येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट मुक्त विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले.

नाशिक : येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट मुक्त विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु ई. वायुनंदन होते. त्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी प्रास्तविक केले. यावेळी विद्यापीठाचे उपकुलसचिव विवेक ओक, उत्तम जाधव यांच्यासह विविध विद्याशाखांचे संचालक, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.भैरवनाथ सेवाभावी संस्थादेवळाली कॅम्प येथील भैरवनाथ महिला सेवाभावी संस्था व शिवसेनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्र मात प्रा. सुनीता आडके यांचे व्याख्यान झाले. याप्रसंगी नगरसेविका आशा गोडसे यांनी अहिल्यादेवींच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला. कार्यक्र मास विजय निकम, राजू खैरनार, विलास गोडसे, सुभाष भांड, काशीनाथ पाबळे, हरिभाऊ तागड, माधव गोडसे, खंडेराव मेढे, चंद्रकांत गोडसे, योगीता तागड, ज्योती पाबळे, रंजना पाबळे, साधना तागड आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश देवकर, तर आभार अनिल पाबळे यांनी मानले.  अहिल्यामाता होळकर यांच्या जयंतीनिमित्त दुर्गा उद्यान येथील पुतळ्यास मनपाच्या वतीने प्रभाग सभापती पंडित आवारे, मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.राष्ट्रवादीतर्फे अभिवादननाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला कार्याध्यक्षा सुषमा पगारे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी आमदार जयवंत जाधव यांनी आपल्या मनोगतातून अहिल्यादेवींच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. प्रदेश सरचिटणीस नानासाहेब महाले यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अंबादास खैरे, संजय खैरनार, संजय बोडके, मनोहर कोरडे, शंकर मोकळ, भारत जाधव, बाळासाहेब गिते, मकरंद सोमशी, महेश भामरे, प्रफुल्ल पाटील, अरविंद सोनवणे, किरण मानके, डॉ. संदीप चव्हाण, रामलाल साखरे, सुनील घुगे, अक्षय कहांडळ, अक्षय अनवट, किरण जगझाप, किरण फडोळ, संकेत शिंदे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक