शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कृषिमंत्री पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 01:20 IST

राज्याच्या कृषी खात्याने शेतकºयांना उत्पादनवाढीसाठी प्रोत्साहित करतानाच त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी ‘एक दिवस शेतावर’ हा उपक्रम सुरू केला असून खुद्द राज्याचे कृषीमंत्री महिन्यातून एक दिवस या उपक्रमासाठी देणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर दादा भुसे यांनी मालेगाव तालुक्यातील वळवाडे येथील शेतकरी शांताराम गवळी यांच्या शेतावर भेट देऊन त्यांच्याशी विविध प्रश्नांवर संवाद साधला.

ठळक मुद्देदादा भुसे यांनी मालेगाव तालुक्यात साधला संवाद

नाशिक : राज्याच्या कृषी खात्याने शेतकºयांना उत्पादनवाढीसाठी प्रोत्साहित करतानाच त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी ‘एक दिवस शेतावर’ हा उपक्रम सुरू केला असून खुद्द राज्याचे कृषीमंत्री महिन्यातून एक दिवस या उपक्रमासाठी देणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर दादा भुसे यांनी मालेगाव तालुक्यातील वळवाडे येथील शेतकरी शांताराम गवळी यांच्या शेतावर भेट देऊन त्यांच्याशी विविध प्रश्नांवर संवाद साधला.खुद्द कृषीमंत्री आपल्या बांधावर अवतरल्याने शेतकºयांनीही आनंद व्यक्त करीत आपले मन मोकळे केले. यावेळी शेतकºयांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन कृषीमंत्री भुसे यांनी दिले.राज्यातील शेतकºयांच्या शेतातील पिकांचे उत्पादन वाढी बरोबरच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महिन्यातुन एक दिवस कृषीमंत्री शेतकºयांच्या बांधावर या उपक्रमांतर्गत भुसे यांनी गुरुवारी (दि.१३) वळवाडे येथे भेट दिली. यावेळी भुसे यांनी शेतकºयांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन निर्यातक्षम उत्पादन घेण्याचे आवाहन केले. शेतकरी गवळी यांच्याशी चर्चा करताना कृषी विभागातील अधिकारी शेतात येतात का, याची त्यांनी विचारणा केली. दरम्यान, शेतकºयांनी पीक विमा योजनेची मागणी केली. त्यानंतर दादा भुसे यांनी मालेगाव तालुक्यातीलच वडनेर, खाकुर्डी, अजंग, वडेल, सावतावाडी, झोडगे, पळासदरे व सायने या गावांना भेटी देऊन तेथील शेतकºयांशी संवाद साधला.कांदा निर्यातबंदी उठविण्याचे प्रयत्नकांदा निर्यातबंदी उठवावी यासाठी केंद्राकडे राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी शेतकºयांना सांगितले. याशिवाय पीक विमा कंपन्यांची बैठक घेतली. येत्या पंधरा दिवसात शेतकºयांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी शेतकºयांना दिल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले. शेतकरी सन्मान व मार्गदर्शक कक्ष उभारण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.१४) जिल्हा आणि विभागवार आढावा बैठका घेत असल्याची माहिती यावेळी कृषिमंत्री भुसे यांनी दिली. कृषी विभागाच्या अधिकाºयांना शेतकºयांचे प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना भुसे यांनी यावेळी दिल्या.

टॅग्स :NashikनाशिकMalegaonमालेगांवagricultureशेती