शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शेती बदलतेय... : बुधाजीराव मुळीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:34 IST

नाशिक : यांत्रिकीकरणाच्या युगात तांत्रिकदृष्ट्या अनेक बदल झाले आहेत. या बदलांचा स्वीकार आपणाला करावा लागणार असला, तरी शेतीची मातीशी निगडित नीतिमूल्ये तंत्रज्ञान आत्मसात करू शकत नसल्याने शेती ही भविष्यात शाश्वत राहणार असल्याने शहराकडे जाणारा लोंढा गावाकडे परतणार आहे. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीसाठी शेती टिकविली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक यांनी केले.

ठळक मुद्देसरपंच हा गावाचा प्रमुख असल्याने त्याने गावाच्या शेतीचे बजेट मांडले पाहिजेगाव समृद्ध झाले तर देश समृद्ध होईल

नाशिक : यांत्रिकीकरणाच्या युगात तांत्रिकदृष्ट्या अनेक बदल झाले आहेत. या बदलांचा स्वीकार आपणाला करावा लागणार असला, तरी शेतीची मातीशी निगडित नीतिमूल्ये तंत्रज्ञान आत्मसात करू शकत नसल्याने शेती ही भविष्यात शाश्वत राहणार असल्याने शहराकडे जाणारा लोंढा गावाकडे परतणार आहे. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीसाठी शेती टिकविली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक यांनी केले.शेतीची दैनावस्था झाली असल्याची वस्तुस्थिती असून, शेतमालाला योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत शाश्वत शेती होणार नाही. सरपंच हा गावाचा प्रमुख असल्याने त्याने गावाच्या शेतीचे बजेट मांडले पाहिजे. गावशेतीचे उत्पादन वाढविण्याचा विचार करताना कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन आणि किंमत देणारे पीक कसे घेता येईल याचाही विचार झाला पाहिजे,असे ही ते म्हणाले.गाव समृद्ध करण्यासाठी शेतीचे नियोजन महत्त्वाचे नक्कीच आहे.शेतकºयाला नैसर्गिक परिस्थितीला वारंवार सामोरे जावे लागते. कीड, रोग, निसर्गाची अवकृपा, पूर यातून शेतीचे नुकसान होते. बिबट्याच्या वावर वाढल्याने पिकांकडे दुर्लक्ष झाले, परंतु हे नुकसान शेतकºयालाच सोसावे लागते. शासनाकडून याला संरक्षण मिळत नाही. खरेतर शेतकरी आणि त्याच्या पिकाची जबाबदारी कायद्याने शासनाने घेतली पाहिजे. सरकारी योजनेत शेतकºयाला भागीदार केले पाहिजे, तरच त्याच्या नुकसानीला संरक्षण मिळू शकेल.शेतकºयाच्या पिकावर देशाची अर्थवाहिनी अवलंबून आहे. बाजारहाट, व्यापार, बॅँका किंबहुना सरकारही शेतकºयावर अवलंबून आहे इतकी शेतकºयाची ताकद आहे. म्हणून शेतकºयांना स्थैर्य प्राप्त होण्यासाठी कायद्याने प्रयत्न झाले पाहिजेत. यांत्रिकीकरणाच्या काळात आपल्या चेहºयाला कुठेही महत्त्व नाही, तर बोटाला महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रेरणादायी उपक्रम : दराडेजो चांगले काम करतो त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावी ही आपल्या देशाची उज्ज्वल परंपरा आहे. त्याच परंपरेने ‘लोकमत’ने गावातील सरपंचांना सन्मानित करण्याचा सुरू केलेला उपक्रम निश्चितच गौरवास्पद आहे. ज्या ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळाले त्यांचे कार्य इतर सरपंचांना निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. प्रत्येक गावाच्या पारावर होणारी चर्चा ही मिनी पार्लमेंटसारखीच असते. येथे होणाºया चर्चेचे प्रतिबिंब गावात, तालुक्यात आणि पुढे देशभरापर्यंत उमटत असते. ज्या गावाचे सरपंच व पोलीसपाटीले क्रियाशील असतील ते गाव आदर्श आणि समृद्ध होण्यास वेळ लागत नाही. गाव समृद्ध झाले तर देश समृद्ध होईल, असेही दराडे म्हणाले.