शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

कृषिपंप जोडणीचे धोरण लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 00:50 IST

नाशिक : राज्यात मार्च २०१८ पर्यंत सुमारे ५० हजार शेतकऱ्यांनी वीजजोडणीसाठी रकमेचा भरणा केला असून, सुमारे दीड लाख शेतकऱ्यांनी नवीन वीजजोडणीसाठी रीतसर अर्ज भरलेले आहेत.

नाशिक : राज्यात मार्च २०१८ पर्यंत सुमारे ५० हजार शेतकऱ्यांनी वीजजोडणीसाठी रकमेचा भरणा केला असून, सुमारे दीड लाख शेतकऱ्यांनी नवीन वीजजोडणीसाठी रीतसर अर्ज भरलेले आहेत. परंतु, याबाबत आजवर कोणतीही कार्यवाही होऊ शकली नाही. या शेतकºयांना कृषिपंप जोडणीसाठी लवकरच धोरण जाहीर केले जाणार असल्याने शेतकºयांना दिलासा मिळणार आहे.प्रलंबित असलेल्या कृषिपंपांसाठीच्या नवीन वीजजोडणी धोरणाबाबत झालेल्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आल्यानंतर ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊन यांनी कृषिपंप धोरणास अंतिम स्वरूप देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे कृषिपंपाचा रखडलाल प्रश्न मार्र्गी लागण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आलेल्या प्रदीर्घ बैठकीमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यातील शेतकºयांकडून वारंवार विचारणा होत असून, विधान मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा होऊन लवकरात लवकर धोरण करण्याची मागणी करण्यात आली होती.प्रस्तावित धोरणामध्ये १०० मीटरपेक्षा कमी अंतर असलेल्या कृषिपंपांना लघुदाब वाहिनीवरून तर १०० ते ६०० मीटर अंतर असलेल्या कृषिपंपांना उच्चदाब विद्युत वितरण प्रणालीवरून वीजजोडणी देण्यात येईल. अशी नवीन जोडणी देताना कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यव्यवसाय विभाग तसेच अन्य विभागांशी समन्वय करून हे धोरण सर्वंकष कसे होऊ शकेल, याबाबत संबंधित विभागाशी चर्चा करून धोरणाला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे.याबाबत आवश्यकतेनुसार क्षेत्रीय स्तरावर संबंधित सर्व विभागांशी समन्वय साधून सर्वेक्षण करण्याच्या सूचना ऊर्जामंत्र्यांनी दिल्या आहेत.--------------------------६०० मीटरपेक्षा अधिक अंतर असलेल्या कृषिपंपांना सौर ऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यात येईल.एकाचवेळी पारंपरिक व सौर ऊर्जा या अपारंपरिक स्रोताद्वारे वीजजोडणी देण्याचे धोरण आखण्यात येईल.

टॅग्स :Nashikनाशिक