शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

कृषी अधिकारी यांनी सरपंचांना वापरले अपशब्द.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 17:37 IST

सर्वतीर्थ टाकेद : कृषी सहाय्यक रणजित आंधळे यांनी वासाळी ता. इगतपुरी येथील आदिवासी सरपंच काशीनाथ कोरडे यांच्याबाबत दूरध्वनीवर अपशब्द वापरले. ह्या कारणावरून टाकेद बुद्रुक भागातील पदाधिकार्यांसह शेतकरी संतप्त झाले आहेत. ग्रामपातळीवरील विकासकामांच्या माध्यमातून गावासाठी झटणार्या कर्तबगार सरपंचाचा अपमान झाल्याने इगतपुरी तालुका सरपंच संघटनाही आक्र मक झाली आहे. संतापलेल्या पदाधिकार्यांनी इगतपुरीचे गटविकास अधिकारी किरण जाधव यांची भेट घेत कृषी सहाय्यक रणजित आंधळे यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी तक्र ारी केल्या.

ठळक मुद्देटाकेद बुद्रुक भागातील पदाधिकार्यांसह शेतकरी संतप्त

सर्वतीर्थ टाकेद : कृषी सहाय्यक रणजित आंधळे यांनी वासाळी ता. इगतपुरी येथील आदिवासी सरपंच काशीनाथ कोरडे यांच्याबाबत दूरध्वनीवर अपशब्द वापरले. ह्या कारणावरून टाकेद बुद्रुक भागातील पदाधिकार्यांसह शेतकरी संतप्त झाले आहेत. ग्रामपातळीवरील विकासकामांच्या माध्यमातून गावासाठी झटणार्या कर्तबगार सरपंचाचा अपमान झाल्याने इगतपुरी तालुका सरपंच संघटनाही आक्र मक झाली आहे. संतापलेल्या पदाधिकार्यांनी इगतपुरीचे गटविकास अधिकारी किरण जाधव यांची भेट घेत कृषी सहाय्यक रणजित आंधळे यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी तक्र ारी केल्या. संबंधित कृषी सहाय्यकाच्या सर्व कामांची तात्काळ तपासणी करावी. त्यांची तातडीने अन्यत्र बदली करावी. राज्याच्या पुरस्कारासाठी कोणतेही काम नसतांना दिशाभूल करून पुरस्कार मिळवला असल्याने सखोल चौकशी करून पुरस्कार परत घ्यावा. त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा अशा अनेक मागण्या शेतकर्यांनी यावेळी केल्या.याबाबत अधिक माहिती अशी की गेल्या वर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंचपदी निवडून येण्याचा पिहला मान काशीनाथ कोरडे ह्या उच्चशिक्षति तरु णाने पटकावला. निवडणुकीनंतर राजकारण बाजूला ठेवीत ह्या युवकाने गावचा चेहरामोहरा बदलून टाकण्यासाठी झपाट्याने पावले उचलली. त्यानुसार दर तीन मिहन्यातून एकदा प्रत्येक विभागाच्या शासकीय अधिकार्यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेण्यात येते. त्यानुसार कृषी सहाय्यक रणजित आंधळे यांना ग्रामसभेचे निमंत्रण देण्यासाठी काशीनाथ कोरडे यांनी भ्रमणध्वनी केला होता. यावेळी झालेल्या संवादावेळी आंधळे यांनी अपशब्द वापरले असा सरपंच काशीनाथ कोरडे यांचा आरोप आहे. ही घटना समजताच ह्या भागातील शेतकरी आण िपदाधिकारी संतप्त झाले. तातडीने त्यांनी गटविकास अधिकारी किरण जाधव यांची भेट घेत कैफियत मांडली. यावेळी तालुका कृषी अधिकारी संजय शेवाळे यांना पाचारण करण्यात आले. अपशब्द वापरणार्या रणजित आंधळे यांची तात्काळ बदली करावी. त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा. त्यांच्या आतापर्यंतच्या सर्व कामांची चौकशी करावी. शासनाची दिशाभूल करून त्यांनी मिळवलेला पुरस्कार सखोल चौकशीअंती परत घ्यावा अशा विविध मागण्या संतप्त शेतकरी आण िपदाधिकार्यांनी यावेळी केल्या.तालुका कृषी अधिकारी संजय शेवाळे यांनी कृषी सहाय्यक रणजित आंधळे यांची योग्य ती चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींना अपशब्द वापरणार्याची अजिबात गय केली जाणार नाही असे गटविकास अधिकारी यांनी सांगितले. उपस्थित शेतकर्यांनी गेल्या ? वर्षापासूनच्या भ्रष्ट कारभाराची अधिकार्यांना इत्यंभूत माहिती दिली. यावेळी वासाळीचे सरपंच काशिनाथ कोरडे, सोनोशीचे सरपंच सिताराम खोंडे अडसरे खुर्दचे बबन बांबळे, माणकिखांबचे सरपंच हरिश्चंद्र चव्हाण, ग्रामपंचायत सदस्त लक्ष्मण धांडे, गोकुळ खादे, दिलीप पोटकुले, विष्णू कोरडे, किसन जाखेरे, किसन कोरडे, नवनाथ लहांगे, नवसु कोरडे, गोविंद जाधव, कैलास भांगरे, उद्धव रोंगटे आदींसह वासाळी, इंदोरे, सोनोशी, खडकेद, काचरवाडी येथील शेतकरी उपस्थित होते.शासकीय अधिकारी आण िसरपंच लोकसेवक आहे. जनतेच्या भल्यासाठी काम करतांना रणजित आंधळे यांनी वापरलेले अपशब्द आदिवासी आण िलोकप्रतिनिधींचा अपमान करणारे आहेत. त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी म्हणून कार्यरत राहणार आहे.- काशीनाथ कोरडे, सरपंच वासाळीकाशीनाथ कोरडे यांच्याबाबत अपशब्द वापरलेले नाहीत. माङयावरील आरोपांत अजिबात तथ्य नाही. फोनवरून झालेले संभाषण नजरचुकीने झालेले आहे.- रणजित आंधळे, कृषी सहाय्यकलोकप्रतिनिधीला अपशब्द वापरणे चुकीचे आहे. मात्र यानिमित्ताने आंधळे यांच्याबाबत मांडलेल्या गंभीर आरोपांबाबत सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.- संजय शेवाळे, तालुका कृषी अधिकारी इगतपुरीसरपंच काशीनाथ कोरडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर चौकशी करावी म्हणून तालुका कृषी अधिकार्यांना कळवले आहे.- किरण जाधव, गटविकास अधिकारी इगतपुरी