शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लासलगाव येथील कृषी प्रदर्शन अदयावत यंत्रसामग्रीने लक्षवेधी ठरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 17:25 IST

येवला : मोबाईलच्या सहाय्याने चालणारा ट्रॅक्टर, घरपोच कृषिनिविष्ठा, मानवचलीत कापणी व पेंडी बांधण्याचे हार्वेस्टर यंत्र अश्या अदयावत यंत्रसामग्रीने लासलगाव येथील कृषी प्रदर्शन आधुनिक माहितीचा खजिना देत लक्षवेधी ठरले. विध्यार्थ्यांच्या पुढाकारातून हे प्रदर्शन भरवले गेले होते. बाभूळगाव येथील कृषि महाविदयालयाच्या पुढाकाराने लासलगावच्या कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भव्य कृषिप्रदर्शन पार पडले.

ठळक मुद्देकृषी प्रदर्शन आधुनिक माहितीचा खजिना

येवला : मोबाईलच्या सहाय्याने चालणारा ट्रॅक्टर, घरपोच कृषिनिविष्ठा, मानवचलीत कापणी व पेंडी बांधण्याचे हार्वेस्टर यंत्र अश्या अदयावत यंत्रसामग्रीने लासलगाव येथील कृषी प्रदर्शन आधुनिक माहितीचा खजिना देत लक्षवेधी ठरले. विध्यार्थ्यांच्या पुढाकारातून हे प्रदर्शन भरवले गेले होते.बाभूळगाव येथील कृषि महाविदयालयाच्या पुढाकाराने लासलगावच्या कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भव्य कृषिप्रदर्शन पार पडले. शेतकऱ्यांना नवनविन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी आणि बळीराजाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने आमदार नरेंद्र दराडे व किशोर दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रदर्शन भरवण्यात आले. प्रदर्शनाचे उदघाटन बाजार समितीचे संचालक रमेश पालवे यांच्या हस्ते झाले. यावेळी पंढरीनाथ थोरे, योगेश पाटील, डॉ.विलास कांगणे, दिपक परदेशी, मधुकर गायकर, शिवा सुरासे, प्राचार्य डॉ. दिनेश कुळधर आदी उपस्थित होते.मान्यवरांचे मार्गदर्शनपर मनोगताने तसेच कंपन्यांच्या स्टॉलला प्रत्यक्ष भेटीने सुरुवात झाली. या कृषिप्रदर्शनामध्ये 15 नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवून प्रदर्शनातून शेतकऱ्यांना अमुल्य माहिती दिली. प्रदर्शनात मोबाईल आधारीत ट्रॅक्टर ऑपरेटिंग, जयकिसान प्रा. लि. यांचे शेतकऱ्यांना घरपोच कृषिनिविष्ठा, तसेच मानवचलीत गहू, ज्वारी, बाजरी, मका कापणी व पेंडी बांधणे कंबाईन हार्वेस्टर यंत्र मुख्य आकर्षण ठरले. सहभागी कंपन्यांनी आपआपले प्रत्यक्ष डेमो देवून सादरीकरण केले. विविध तंत्रज्ञानाचे बदलते स्वरूप व आधुनिक शेती याविषयी शेतकरी बांधवांसाठी चर्चासत्रसुद्धा घेण्यात आले. कृषि महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश कुळधर यांनी रोग किड एकात्मिक नियंत्रण तर डॉ.एस. डी. थोरात यांनी अन्नद्रव्य व तणव्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. प्रा.एन.बी.शिंदे, प्रा.आर.एस.नरोटे, प्रा. जे.एस.राठोड, प्रा.युवराज ठोंबरे, प्रा.व्ही.बी.रोहमारे, प्रा.के.एम.मुठाळ, प्रा.के.ए.माळी, प्रा.एस.बी.पगारे, प्रा.पी.जी.झिरवाळ, प्रा.एम.जी.ढगे,प्रा.ए.एस.आहेर, व कृषिदूतांनी संयोजन केले.